how to get rid of rats at home google
लाइफस्टाइल

Rat Remedy : असं काहीतरी करा की घरातले सगळे उंदीरमामा एका झटक्यात धूम ठोकतील

उंदीर घालवण्यासाठी पेपरमिंट हा एक शक्तिशाली उपाय आहे. जिथे उंदीर येतात तिथे पेपरमिंट स्प्रे वापरा.

नमिता धुरी

मुंबई : घरात उंदरांचा सुळसुळाट झाला असेल तर डोक्याला ताप होतो. मग असं काही तरी करा सगळेच्या सगळे उंदीर एकाच वेळी धूम ठोकतील. तुम्हाला काही सुचत नसेल तर हा लेख वाचा. (Home Remedies for Rats)

पेपरमिंट स्प्रे केल्यास उंदीर निघून जातील

उंदीर घालवण्यासाठी पेपरमिंट हा एक शक्तिशाली उपाय आहे. जिथे उंदीर येतात तिथे पेपरमिंट स्प्रे वापरा. उंदरांना त्याचा वास आवडत नाही, ते लगेच ते ठिकाण सोडतील. हा उपाय करून पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की उंदीर हळूहळू नाहीसे होतील. हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान? 

बेसनाच्या पिठात तंबाखू मिसळा

जर तुम्हाला घरातून उंदरांना निरोप द्यायचा असेल तर तंबाखू आणि बेसन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक असली तरी उंदरांची दहशत संपवण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. (home remedies to get rid of rats)

तंबाखूच्या धुंदीमुळे उंदरांना त्रास होतो आणि ते घराबाहेर पडतात. तुम्हाला फक्त तंबाखूमध्ये बेसन आणि तूप मिसळून उंदरांच्या जागी ठेवावे लागेल. जेणेकरून त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल.

तुरटीची फवारणी केल्यास उंदरांची दहशत संपुष्टात येईल

तुरटी हा उंदरांचा ज्ञात शत्रू आहे. त्याची चव त्यांना अजिबात आवडत नाही. तुरटीच्या पावडरचे द्रावण तयार करून उंदरांच्या जागी शिंपडा. यामुळे उंदीर ते ठिकाण सोडून कायमचे निघून जातात.

लाल मिरची

घरामध्ये सर्वत्र लाल तिखट शिंपडा, जिथे उंदरांचे येणे-जाणे आहे. या उपायानंतर उंदीर पुन्हा त्या ठिकाणी येण्याची हिंमत करणार नाहीत आणि तुमची सुटका होईल.

कापूर उंदरांना शिकवेल धडा

उंदरांना कापूरचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याचा श्वास फुलू लागतो. जर तुम्हाला घरातून उंदीर पळवायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरचे तुकडे ठेवा. असे केल्याने उंदीर आपोआप घराबाहेर पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT