Cooking Tips | तुमची भजी खूप तेलकट होतात का ? जाणून घ्या कारणे आणि उपाय why bhaji becomes so oily how to make oil free bhaji | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhaji

Cooking Tips : तुमची भजी खूप तेलकट होतात का ? जाणून घ्या कारणे आणि उपाय

मुंबई : भजी खायला आपल्याला सर्वांनाच आवडते. अनेकदा आपण सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या चहासोबत भजी खातो. पण घरी केलेली भजी बरीचशी तेलकट होते. त्यामुळे ती फारशी खाता येत नाही.

पण भजी इतकी तेलकट का होते याची कारणं जाणून घेतल्यास ही समस्या सोडवता येऊ शकते. (why bhaji becomes so oily how to make oil free bhaji) हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

बेसनाचे पीठ खूप पातळ

हे एक सामान्य कारण आहे, ज्यामुळे तुमची भजी तेलकट होते. भजीचे पीठ तयार करण्यासाठी बेसन आणि मसाले पाण्यात मिसळले जातात. जेव्हा तुम्ही त्या पिठात भजी बुडवता तेव्हा त्यांना फारसा लेप लागत नाही.

त्यामुळे कांदा किंवा बटाट्याला बरेच तेल धरून राहाते. अशावेळी पिठात थोडे अधिक बेसन घालून ते थोडे घट्ट करावे. या पिठात तेलाचे ३-४ थेंब घातल्यास भजी जास्त तेल शोषत नाहीत.

चुकीच्या भांड्यात तळणे

तुम्ही ज्या भांड्यात भजी तळत आहात त्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही भजी तळता तेव्हा तुम्ही तळण्यासाठी वापरत असलेल्या भांड्याचा तळ जाड असेल याची खात्री करा.

असे केल्याने तेलाचे तापमान स्थिर राहाण्यास मदत होते. तेलाचे तापमान योग्य राहिल्यास भजीही तुलनेने कमी तेलकट होतात.

कढईत पुरेसे तेल नसणे

आपण अनेकदा या गोष्टीकडे लक्ष देत नाही, पण या चुकीमुळे भजी सहसा जास्त तेल शोषून घेतात. खरं तर, बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तुम्ही भजी तळून काढता आणि हळूहळू तेल निघू लागतं, तेव्हा तुम्ही सर्व भजी पातेल्यात एकत्र ठेवता.

असे केल्याने भजी एकत्र चिकटतात आणि त्यांचा थर निघू शकतो. त्यामुळे भजी अधिक तेल शोषून घेतात. या स्थितीत, एकतर तुम्ही अतिरिक्त तेल घाला आणि ते गरम होण्याची प्रतीक्षा करा किंवा भजी हलकी तळा.

खूप जाड पीठ

जसे भजीचे पीठ खूप पातळ असेल तर ते खूप तेलकट बनू शकते, त्याचप्रमाणे जर भजीचे पीठ खूप घट्ट असेल तर ते देखील खूप तेलकट बनू शकतात.

पिठाचा जाडपणा कमी करण्यासाठी त्यात थोडेसे पाणी घालू शकता आणि साध्या व्हिस्कचा वापर करून ते तयार करू शकता. थोडासा बेकिंग सोडाही टाकू शकता. या प्रकारचे पिठ जास्त हवेशीर होते आणि त्यामुळे भजीमध्ये कमी तेल शोषले जाते.