लाइफस्टाइल

नखांची बुरशी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्याल?, वाचा टिप्स

सकाळ डिजिटल टीम

नखाला बुरशी लागायची 4 कारणे असू शकतात.

तुम्ही तुमच्या हातांच्या पायांच्या नखाच्या रंगाकडे निट लक्ष द्या. ते पिवळे तर होत नाही ना हे एकदा तपासून बघा कारण, आता नखांना बुरशी लागण्याचा प्रकार खुप वाढला आहे. नखाला बुरशी लागायची 4 कारणे असू शकतात. या बुरशीजन्य नखांच्या संसर्गाला "टिनिया अनग्युअम" असेही म्हणतात. हा एक संसर्ग पायाच्या नखांवर अधिक परिणाम करतो.

तुमच्या पायाची नखे पिवळी होत आहेत का?

सहसा असे झाले तर आपण त्याला किरकोळ समजून मोठी चुक करुन बसतो. शरीरात धूळ गेल्यास किंवा काही नसल्यामुळे नखांचा रंग बदलत असेल असे आपल्याला वाटते, परंतु प्रत्यक्षात ते नखांच्या बुरशीचे लक्षण आहे. बुरशीजन्य नेल इन्फेक्शन ही एक सामान्य स्थिती आहे जी तुमच्या नखेच्या टोकाखाली पांढरे किंवा पिवळसर ठिपके म्हणून सुरू होत. ही बुरशी जसं जसं खोलवर होत जाईल तसतशी तुमची नखे रंगू शकतात. तसेच तुमची नखे घट्ट होऊ शकतात किंवा काही वेळा अगदी बारीक बारीक कडा जाऊ शकतात.

अशा गोष्टी नखे खराब होतात आणि काही लोकांना यातून संसर्ग होऊ शकतो. तर काही लोकांसाठी ही समस्या गंभीर बनते. या संसर्गात नखांमध्ये वेदना होऊन रक्तही वाहू लागते. पण काही संसगर्ग झालेल्या लोकांची स्थिती गंभीर नसल्यास त्यांना उपचारांची गरज नसू शकते. परंतु नखात जर वेदना होत असेल दवाखान्यात जाऊन योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया नेल फंगसची कारणे आणि लक्षणे...

नखा बुरशी का लागते?

वय जस वाढत तस वाढत्या वयाबरोबर अनेकांना वेळा नखांमध्ये बुरशीची समस्या उद्भवते. वय वाढल्यामुळे तुमची नखे तुटून कोरडी होतात. नखांमधील क्रॅशेशमुळे बुरशीचे प्रवेश होऊ शकतात आणि संसर्ग होऊ शकतो.

तुमच्या शरीरात रक्ताभिसरण कमी होणे

पायात रक्ताभिसरण कमी होणे हे देखील बुरशीजन्य संसर्गाचे मुख्य कारण आहे.हात आणि पायांना जास्त घाम येतो, त्यामुळे त्यांना नखांमध्ये बुरशीची लागण होण्याची शक्यता असते.

नखे बुरशीचे परिणाम

नेल फंगसमुळे तुमच्या नखांना खूप नुकसान होते. यामुळे पायाचे इतर संक्रमण देखील होऊ शकते. विशेषत: जर तुम्हाला मधुमेह असेल तर पायातील रक्ताभिसरण आणि मज्जातंतूंचा पुरवठा कमी होतो. यामुळे सेल्युलायटिसचा धोकाही वाढतो. काही लोकांसाठी संक्रमणांवर उपचार करणे कठीण होऊ शकते.

नखांची बुरशी टाळण्याकरता टिप्स

1) नियमितपणे हात पाय व्यवस्थित धुवा.

2) तुमची नखे लहान व स्वच्छ ठेवा.

3) तुमचे नख निर्जंतुक करा. नेहमी स्वच्छ,मोजे घाला. 4)चांगल्या दर्जाचे बुट घाला.

5) फाईलरने नखे सरळ करा आणि कडा गुळगुळीत करा. 6)जुने बुट घालताना त्यांना बॅक्टेरियामुक्त करा.

7) नेलपॉलिश आणि कृत्रिम नखे वापरणे टाळा.

8) जर तुम्ही मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करत असाल तर तिथे विशेष काळजी घ्यायला सांगावी.

नवीन नखे जोपर्यंत संसर्गमुक्त होत नाही तोपर्यंत नखांचे संक्रमण पूर्णपणे बरे मानले जात नाही. अर्थात, हा धोका नाही, परंतु नखे बुरशीचे परत येणे शक्य आहे.पण तरी आपण आपल्या नखांची निट काळजी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT