kitchen tips  esakal
लाइफस्टाइल

भांड्याच स्टँड खराब झालयं? सफाई करताना वापरा सोप्या ट्रिक्स

या ट्रिक्स वापरुन पहाच

सकाऴ वृत्तसेवा

बऱ्याच लोकांची तक्रार आहे की, भांड्याचे स्टँड भिंतीमध्ये ठेवल्यामुळे ते काढणे आणि स्वच्छ करणे खूप कठीण जाते.

बहुतेक घरांमध्ये, लोक भांडी एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी भांडे स्टँड वापरतात. यामुळे भांडी इकडे -तिकडे विखुरली जात नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का, जर ते स्टॅण्ड जास्त काळ स्वच्छ केले नाही तर त्यावर घाण साचू लागते, जी केवळ खराबच दिसत नाही, तर त्यामुळे अनेक आजार देखील होऊ शकतात.

बऱ्याच लोकांची तक्रार आहे की, भांड्याचे स्टँड भिंतीमध्ये ठेवल्यामुळे ते काढणे आणि स्वच्छ करणे खूप कठीण जाते. जर तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल आणि ते सहजपणे स्वच्छ करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्या ट्रिक्स वापरून तुम्ही भांड्याचे स्टँड भिंतीवरून न काढता सहज स्वच्छ करू शकता. चला तर मग त्या ट्रिक्स जाणून घेऊया.

अशा प्रकारे भांड्यातील गंज करा स्वच्छ...

- बऱ्याचवेळा काहीजण भिजलेली भांडी स्टँडमध्ये ठेवतात, ज्यामुळे भांड्याच्या स्टँडला गंज चढतो. अशा परिस्थितीत सर्वप्रथम सर्व भांडी स्टँडवरून काढून स्वच्छ ठिकाणी ठेवा.

- यानंतर, त्यावरील गंज स्वच्छ करण्यासाठी, दोन मग पाणी हलके गरम करा आणि त्यात दोन चमचे अमोनिया चांगले मिसळा.

-आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये टाका आणि स्टँडच्या सभोवती फवारणी करा आणि नंतर 10 मिनिटे असेच राहू द्या.

- 10 मिनिटांनंतर, ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने स्टँडमधील गंज घासून स्वच्छ करा. त्यानंतर ते पाण्याने धुवा.

- त्यावरील गंज काढण्यासाठी स्क्रब देखील वापरू शकता. भांड्याच्या स्टँडवर स्क्रब चोळल्याने गंज अधिक सहजपणे दूर होईल.

भांड्यातील धूळ-माती आणि तेल अशा प्रकारे स्वच्छ करा...

स्वयंपाकघरात अन्न शिजवताना, तेल आणि त्याच्या वाफेद्वारे, भांडी स्टँडवर जमा होऊ लागतात. मग जेव्हा त्यावर धूळ पडते, तेव्हा ती स्टँडला आणखी वाईट रीतीने चिकटते. ज्यामुळे भांडे स्टँड चिकट होतात आणि खूप वाईट दिसतात. अशा परिस्थितीत, तुम्ही बेकिंग सोडादेखील स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. यासाठी तुम्ही थोडसं सोडा आणि थोडे पाणी शिंपडून ते थोडे ओलसर करा. त्यानंतर, कापड किंवा पॉलिथिनच्या मदतीने संपूर्ण स्टँडवर ठेवा. यावेळी, तुमच्या हातात हातमोजे घालणे आवश्यक आहे. स्टँडला सोडा लावल्यानंतर 10 मिनिटे असेच ठेवा. त्यानंतर ते स्क्रबर किंवा लिंबाच्या सालीच्या मदतीने चांगले चोळा आणि नंतर पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT