डाळी, कडधान्यांमध्ये होणाऱ्या किड्यांपासून होईल सुटका; जाणून घ्या Kitchen Tips

डाळी, कडधान्यांमध्ये होणाऱ्या किड्यांपासून होईल सुटका; जाणून घ्या Kitchen Tips

अनेक स्त्रियांना महिनाभर किंवा वर्षभर पुरेल इतकं वाणसामान भरुन ठेवण्याची सवय असते. यात खासकरुन कोरडे पदार्थ, गहू, तांदूळ, डाळी किंवा कडधान्य  यांचा समावेश असतो. वर्षभर साठा करायचा असल्यामुळे गृहिणी अनेकदा हे पदार्थ डब्यात भरण्यापूर्वी त्याला कडक ऊन दाखवतात. मात्र, तरीदेखील हे पदार्थ कालांतराने खराब होऊ लागतात. पावसाळा,हिवाळा या ऋतुंमध्ये पदार्थांना बुरशी लागते.तर उन्हाळ्यात डाळी, कडधान्य यांच्यात किडे होतात. वर्षभर पुरणाऱ्या या सामानाला अशी कीड लागल्यानंतर हे पदार्थ टाकून देणं जीवावर येतं. त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकण्यासाठी नेमकं काय करता येईल हे आज जाणून घेऊयात. पदार्थ वर्षभर टिकवण्याच्या काही सहजसोप्प्या युक्त्या आहेत. ज्यामुळे तुमचं वाणसामान वर्षभर आराम टिकेल.

१. तमालपत्र -
तांदूळ किंवा गहू यांच्यात होणाऱ्या किड्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर या पदार्थांमध्ये तमालपत्राची ४-५ पानं टाकून ठेवा. तमालपत्राच्या उग्र वासामुळे कोणताही किटक त्याच्या आसपास फिरकत नाही.

२. बोरिक पावडर -
खासकरुन तांदळाला बोरिक पावडर लावल्यामुळे त्यात आळ्या होत नाहीत. प्रथम तांदूळ उन्हात कडक वाळवून घ्या त्यानंतर त्यात बोरिक पावडर घाला. त्यामुळे तांदूळ वर्षभर आरामात टिकतील. परंतु, तांदूळ वापरतांना ते स्वच्छ पाण्यातून ३-४ वेळा धुवून घ्या.

३. कडुनिंबाची पानं-
साधारणपणे तांदूळ, गहू वा कडधान्यांमध्ये कडुनिंबाची पानं घालतात हे साऱ्यांनाच ठावूक आहे. या पानांमुळे डब्यात निर्माण होणारा दमटपणा नाहीसा होता. त्यामुळे पीठ, रवा, बेसन या सारख्या पदार्थांमध्ये गुठळ्या होत नाही. ते पदार्थ महिनाभर कोरडे राहतात.

४.  वर्तमानपत्र -
कोरड्या पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत. या वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे किटक पदार्थांभोवती फिरकत नाहीत.

५. पदार्थ भाजून घ्या -
रवा, बेसन, शेंगदाणे हे पदार्थ खराब होऊ नये यासाठी ते थोडे भाजून घ्या. रवा व बेसन गुलाबी रंगापर्यंत भाजा.तर शेंगदाणे त्याची टरफले निघेपर्यंत भाजा, त्यामुळे शेंगदाण्यांना कुबट वास येत नाही.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com