Life Mantra esakal
लाइफस्टाइल

Life Mantra : आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असेल तर पालकांसोबतचं तुमचं नातं असं घट्ट करा

तुमच्या पालकांसोबत तुमचे नाते घट्ट कसे करता येईल याचा विचार करणे महत्वाचे ठरते

साक्षी राऊत

Life Mantra : तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भावनिक आरोग्य आणि आनंद तुमच्या पालकांसोबतच्या नातेसंबंधावर अवलंबून आहे. आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आणि किती समाधानी आहोत हे कुटुंबातील सदस्य किती आनंदी आहेत किंवा आपल्याला कुटुंबाकडून आपल्याला किती प्रेम मिळते यावर बरेच अंशी अवलंबून असते. तेव्हा तुमच्या पालकांसोबत तुमचे नाते घट्ट कसे करता येईल याचा विचार करणे महत्वाचे ठरते.

कम्युनिकेश महत्वाचं

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, ऑन्टोलॉजिस्ट, मानसिक आरोग्य आणि रिलेशनशिप एक्सपर्ट आशमीन मुंजाल म्हणतात, “मोकळा आणि प्रामाणिक संवाद हा कोणत्याही यशस्वी नातेसंबंधाचा आधारस्तंभ असतो. तुमच्या पालकांशी बोला, तुमचे विचार व्यक्त करा आणि त्यांना काय म्हणायचे आहे याकडे बारकाईने लक्ष द्या. तुमची मते आणि चिंता आदरपूर्वक व्यक्त करा आणि इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहित करा."

पालकांचे आभार माना

अनेक वेळा वय वाढले की परिस्थितीला कसे सामोरे जायचे यावर पालक आणि मुलांमध्ये वैचारिक मतभेद होतात. दोघांचाही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण वेगळा असल्याने त्यांच्यात वाद होतात.

कुटुंबात संतुलन आणि शांतता कायम राहण्यासाठी, कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्यासाठी करत असलेल्या चांगल्या गोष्टींवर त्यांनी नियमितपणे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंधातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असणे ही तुमच्यासाठी अर्थपूर्ण आणि वादविरहित नातेसंबंध निर्माण करण्याची पहिली पायरी असेल.

Life Mantra

तुमच्या नातेसंबंधांचा जगावरही प्रभाव पडतो

“असे म्हटले जाते की आपल्या स्वतःच्या पालकांशी असलेल्या नातेसंबंधाचा परिणाम लोकांवर आणि बाहेरच्या जगात आपण भेटत असलेल्या इतर नातेसंबंधांवर होतो. म्हणूनच तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ असणे महत्त्वाचे आहे.

तक्रारी किंवा जुने भांडण लक्षात ठेवल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. क्षमा करण्याचा प्रयत्न करा आणि कोणताही राग मनात ठेवू नका. आपल्यापैकी कोणीच परिपूर्ण नसतं तेव्हा क्षमा केल्याने जुन्या गोष्टी विसरण्यास आणि नातेसंबंध मजबूत करण्यात मदत होऊ शकते. (Lifestyle)

स्तूती करायला विसरू नका

आपल्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. त्यांचे प्रयत्न, त्याग आणि त्यांनी तुम्हाला दाखवलेल्या प्रेमाबाबत त्यांना धन्यवाद द्या. तुमच्या पालकांसाठी एखादी नोट लिहून त्यांना धन्यवादही तुम्ही म्हणू शकता. पालकांच्या विचारांचा आदर करा आणि त्यांना समजून घ्या. (Family)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना दिले जाणारे सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच केले जात आहेत - मेदान्ता रुग्णालय

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT