Rishi Panchami 2023  esakal
लाइफस्टाइल

Rishi Panchami 2023 : कधी आहे ऋषीपंचमी,जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि पौराणिक महत्व

ऋषीपंचमीला महिलांनी गंगेत स्नान केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते

Pooja Karande-Kadam

Rishi Panchami 2023 : हिंदू धर्मातील उपवास व्यक्तीला पापकर्मांपासून मुक्त करतो. असेच एक व्रत म्हणजे ऋषीपंचमी. हा सण प्रामुख्याने महिलांचा मानला जातो. धार्मिक ग्रंथांनुसार, ज्या स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि पूजा करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते.

अशा मान्यता आहे की, या उपवासाने कळत-नकळत केलेली पापे नष्ट होतात. ऋषीपंचमीचा दिवस देवी-देवतांना नव्हे तर सात ऋषींना समर्पित आहे. जाणून घेऊया ऋषीपंचमीची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व.

आपल्या संस्कृती ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्व असतं. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात. यादिवशी ऋषिंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून त्यांना वंदन केले जाते.

ऋषी पंचमी 2023 तिथी

20 सप्टेंबर 2023 रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. ऋषीपंचमीला महिलांनी गंगेत स्नान केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. या दिवशी ऋषी मुनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, अत्रि, गौतम आणि भारद्वाज ऋषी यांची पूजा केली जाते. (Ganesh Chaturthi 2023)

ऋषी पंचमी 2023 मुहूर्त

यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 01 वाजून 43 मिनिटांनी सुरू होईल आणि 20 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 02 वाजून 16 मिनिटांनी संपेल.

सप्त ऋषींच्या पूजेची वेळ - सकाळी ११.०१ ते दुपारी ०१.२८

वेळ - २ तास २७ मिनिटे

महिलांसाठी का आहे खास

ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण महिला करतात. या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये अशी आख्यायिका आहे. आजही ग्रामीण भागात शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्लेच जात नाहीत.

अशी प्रथा आहे. म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रानभाज्या भाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. आता या सर्व भाज्या शहरांमध्येही बाजारात उपलब्ध असतात. शहरांमध्ये काही भागात ग्रामीण भागातील भाजी विक्रेते या भाज्या विकायला घेऊन येतात. (Rushi Panchami 2023)

ऋषी पंचमीसाठीचा मंत्र कोणता आहे?

कश्यपोतीर्थरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:.

जमदगनिनिर्वशेषाचा सप्तैते ऋष्य: स्मृती:.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: निधी नसेल तर सिगारेट अन् दारूवर कर लावा, पण... सुनावणीच्या मध्येच सरन्यायाधीश का संतापले?

सोनम वांगचुकना हटवण्यासाठी ३० सेकंदाचा प्लॅन, पहाटे ३ पासून हालचाली; साध्या वेशात पोलीस, चादरीचा पडदा लावून उचललं

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरवर अमित ठाकरेंची हजेरी; अभिजीत दिपकेंची घेतली भेट

FDA: तुकाराम मुंढेंचा प्रहार! बदलापुरात मोठी कारवाई, दोन टपऱ्या सील; भेसळखोरांसह अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

ODI World Cup Format: वर्ल्ड कपच्या नव्या फॉरमॅटला विरोध! ICC विरोधात चार देश उभे राहिले, WCA चे पाठबळ मिळाले; कोणासाठी केला जातोय बदल? थेट सवाल

SCROLL FOR NEXT