मराठी भाषा गौरव दिन Esakal
लाइफस्टाइल

Marathi Bhasha Gaurav Din 2024 : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त द्या मराठीतून शुभेच्छा! प्रियजनांना सांगा मायबोलीचं महत्त्व

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त द्या मराठीतून शुभेच्छा! | Marathi Bhasha Gaurav Din Wishes Messages Greetings in Marathi

Aishwarya Musale

मराठी भाषेच्या गौरवासाठी आजही राज्य आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कार्य केलं जात आहे. त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी 27 फेब्रुवारी म्हणजे आज साजरा केला जातो. भारतामध्ये मराठी लोकसंख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिव्हाळ्याची आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर जगाच बोलायचं झालं तर मराठी भाषा ही 10 व्या क्रमांकावर येते. विशेष म्हणजे भारतातील 22 अधिकृत भाषांमध्ये तिचा समावेश देखील आहे.

यामुळे मराठी भाषेच्या अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने आज आपल्या नातेवाईकांना, मित्र परिवारास खास मराठमोठ्या शुभेच्छा पाठवल्या पाहिजे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्रामच्या माध्यमातून या शुभेच्छा पाठवत मराठी भाषेचा गौरव साजरा करा. 

1. माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

2.धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी राजभाष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

4. मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

5. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

6. "मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

7. रुजवू मराठी, फुलवू मराठी

चला बोलू फक्त मराठी

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

9. हसा मराठी, बोला मराठी

जगा मराठी, वाढवा मराठी

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

10. जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT