कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

Kolhapur Rain News चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी जोतिबा डोंगरावर गुलालात न्हाऊन निघालेले भाविक पावसातही चिंब भिजले. जोतिबा डोंगरावर दिवसभर उन्हाच्या कडाक्यानंतर सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी
Updated on

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दुपारी तीन वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पन्हाळगडासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. चैत्र यात्रेच्या दिवशीच जोतिबा डोंगरावर गुलालात न्हाऊन निघालेले भाविक पावसातही चिंब भिजले. जोतिबा डोंगरावर दिवसभर उन्हाच्या कडाक्यानंतर सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी वीज कोसळून ५ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडलीय. Kolhapur Weather Update Lightning Strike at Jyotiba Hill Leaves Five Injured

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com