Skincare Routine
Skincare Routine esakal
लाइफस्टाइल

Skincare Routine : इन्स्टावरील 'ट्रेंड'ला अंधपणे फॉलो करणं टाळा; तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन ठरवा स्किनकेअर रुटीन

Monika Lonkar –Kumbhar

Skincare Routine : आजकाल सोशल मीडियावर सर्रासपणे विविध विषयांवरील व्हिडिओ बनवले जातात. ज्यामध्ये आरोग्य, स्किनकेअर, हेअरकेअर इत्यादी अनेक विषयांवरील व्हिडिओंचा समावेश आहे. अनेक कंटेंट क्रिएटर्स अशाप्रकारचे व्हिडिओ बनवतात. या व्हिडिओमध्ये काही जण आम्ही या प्रकारचे स्किनकेअर रूटीन फॉलो करतो, तुम्ही ही करा अशा प्रकारे आवाहन देखील व्हिडिओमध्ये करताना दिसतात.

मग, आपल्यातील अनेक महिला त्या व्हिडिओमध्या दाखवल्या प्रमाणे स्किनकेअर प्रॉडक्ट्स खरेदी करतात. त्याचा वापर चेहऱ्यावर करताना दिसतात. मात्र, हे प्रॉडक्ट्स खरच तुमच्या त्वचेला सूट होतात का?  हे प्रॉडक्ट्स तुम्ही खरेदी करणे खरच गरजेचे आहे का? याची पडताळणी करणे अतिशय महत्वाचे आहे.

तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे? ते जाणून घ्या

तुम्ही त्वचेसाठी कोणत्या प्रकारचे स्किनकेअर प्रॉडक्ट्स खरेदी करायला हवेत?  हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे? हे माहित करून घेणे जास्त महत्वाचे आहे. आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे? हे जाणून घेण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ‘थांबा आणि पाहा’ होय.

या पद्धतीमध्ये सर्वात आधी हलक्या क्लिंझरच्या मदतीने तुमचा चेहरा धुवा. त्यानंतर, चेहरा कोरडा करा. आता कोणतेही प्रॉडक्ट चेहऱ्यावर न वापरता ३० मिनिटे प्रतिक्षा करा.

जर ३० मिनिटांनंतर तुमची त्वचा ही चमकदार दिसत असेल तर, तुमची त्वचा ही तेलकट प्रकारची आहे. जर ३० मिनिटांनंतर तुमची त्वचा कोरडी किंवा निस्तेज वाटत असेल तर तुमची त्वचा कोरडी आहे.

जर तुमच्या त्वचेवरील चमक ही फक्त कपाळ आणि नाकाजवळ आहे. मात्र, इतर भागातील त्वचा चकचकीत असेल तर तुमची त्वचा मिश्र (Combination Skin) प्रकारची आहे. या उलट ३० मिनिटांनंतर तुमची त्वचा आरामदायक आणि फ्रेश वाटत असेल तर तुमची त्वचा सामान्य (Normal Skin) आहे.

रोजचे स्किनकेअर रूटीन फॉलो करा

क्लिंझर

तुमच्या रोजच्या स्किनकेअर रूटीनमध्ये क्लिंझरचा समावेश असायलाच हवा. हे अतिशय महत्वाचे स्किनकेअर उत्पादन आहे. याचा वापर चेहऱ्यावर केल्याने त्वचेतील घाण, अतिरिक्त तेल, मेकअप आणि बॅक्टेरिआ काढून टाकण्याचे काम करते. सकाळी आणि रात्री एकदा तुम्ही याचा वापर चेहरा स्वच्छ करण्यासाठी करू शकता. खास करून सौम्य क्लिंझरचा वापर करा. मृत त्वचेपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही दोन दिवसांतून एकदा एक्सफोलिएटिंग क्लिंझरचा वापर करू शकता.

टोनर

क्लिंझरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि त्वचेतील रोमछिद्रे काढून टाकण्यासाठी टोनरचा वापर अवश्य करा. चेहऱ्यावरील मुरूम आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी टोनर मदत करते.

मॉईश्चरायझर

त्वचेला मॉईश्चरायझर लावल्यानंतर तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. शिवाय, मॉईश्चरायझरचा वापर केल्याने त्वचेतील घाण, बॅक्टेरिआ, अतिरिक्त तेल यांपासून त्वचेचे संरक्षण करते. त्यामुळे, स्किनकेअर रूटीनमध्ये मॉईश्चरायझरचा वापर करायला विसरू नका.

त्वचेसाठी सीरम

तुमच्या त्वचेसाठी कोणते सीरम फायदेशीर ठरेल? याचे उत्तर तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून आहे. रोजच्या स्किनकेअर रूटीनमध्ये तुम्ही सीरमचा समावेश करू शकता. मात्र, तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या सीरमचा वापर करायला विसरू नका.

niacinamide आणि hyaluronic acid हे फेस सीरम्स संवेदनशील त्वचा आणि मुरूम असलेल्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. तुम्हाला सीरम संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्वचातज्ज्ञाला (Dermatologist) भेटू शकता आणि तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या सीरमबद्दल जाणून घेऊ शकता.  

अशी उत्पादने जी तुम्ही टाळायला हवीत

आजकाल मार्केटमध्ये अनेक प्रकारचे स्किनकेअर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. यातील कित्येक स्किनकेअर प्रॉडक्ट्सवर लेबल नसते किंवा त्यात ज्या घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यांची लिस्ट त्यावर दिलेली नसते. त्यामुळे, शक्यतो असे स्किनकेअर प्रॉडक्ट्स खरेदी करू नका आणि त्यांचा वापर करणे कटाक्षाने टाळा.

जर तुम्ही तुमचा मेकअप हा अल्कोहोल बेस्ड असलेल्या मेकअप रिमूव्हरने काढत असाल तर हे करणे टाळा. यासाठी तुम्ही कापसाचा वापर करू शकता. कापसाचा वापर करून चेहऱ्यावरील मेकअप काढा.

असे स्किनकेअर प्रॉडक्ट्स ज्यामध्ये PEGs (Polyethylene glycols), methyl आणि  प्रॉपायल पॅराबीन्स, अ‍ॅल्युमिनिअम, फॉर्माल्डेहाईड, पॅथालेट्स इत्यादी घटक असतील तर या प्रॉडक्टसचा त्वचेवर वापर करणे टाळा. यामुळे, तुमच्या त्वचेला इचा पोहचू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT