stomach pain
stomach pain sakal
लाइफस्टाइल

पोटदुखी केवळ ॲसिडिटीचे नाही तर असू शकते 'या' आजाराचे लक्षण

सकाळ डिजिटल टीम

पोटदुखी ही ॲसिडिटीची समस्या मानून बहुतेक महिला याकडे खाण्यापिण्याच्या विकाराशी जोडून दुर्लक्ष करतात किंवा तीव्र वेदना झाल्यास वेदनाशामक गोळी घेतात. पण, महिलांनी दुर्लक्षित केलेली ही समस्या गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असल्याचे आढळून आले आहे. हा अभ्यास राज्य सरकार संचालित कामा रुग्णालय आणि जेजे रुग्णालयाने केला आहे.

मुंबईच्या कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयात जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत गर्भाशयाच्या कर्करोगासाठी एक पूर्वलक्षी निरीक्षणात्मक अभ्यास आयोजित केला गेला. कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे, जेजे रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या वरिष्ठ निवासी डॉ. राजश्री थाटीकोंडा, कनिष्ठ निवासी डॉ. दिशांत उपाध्याय आणि डॉ. कुमारी अंकिता यांनी हा अभ्यास केला. उपचार घेत असलेल्या गर्भाशयाच्या कर्करोगाने पीडित ३६ महिलांवर हा अभ्यास करण्यात आला.

१३ टक्के प्रकरणे अनुवांशिक

या अभ्यासात समाविष्ट असलेल्या अंडाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या १३ टक्के महिला अनुवांशिक असल्याचे आढळून आले. गर्भाशयाचा कर्करोग हा मांडीचा सांधा आणि ओटीपोटात पसरत नाही, तोपर्यंत शोधला जाऊ शकत नाही. अनेकदा या आजाराची लक्षणे सुरुवातीला किंवा शेवटी दिसून येत नाहीत. त्यामुळे, महिलांनी अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी केले आहे.

काळजी घेण्याची गरज

विविध स्त्रीरोगविषयक कर्करोगांपैकी गर्भाशयाचा कर्करोग हा नव्याने जास्त प्रमाणात उदयास आला आहे. राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या मते, २०२३ मध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची अंदाजे १९,१७० नवीन प्रकरणे नोंदवली गेली, अंदाजे १३,७२० मृत्यू झाले आहेत. शिवाय, डिम्बग्रंथी कर्करोगाच्या नवीन प्रकरणांचे प्रमाण दर वर्षी प्रति १००,००० महिलांमध्ये १०.३ होते. आणि मृत्यू दर प्रति १००,००० महिलांमध्ये ६.३ होता. डिम्बग्रंथी कर्करोगासाठी ५ वर्षाचा सरासरी जगण्याचा दर ५०.८ टक्के होता. त्‍यामुळे आरोग्‍याची काळजी घेण्याची गरज आहे.

हे आहे प्रमाण-

मुख्य तक्रारी - टक्के

पोट दुखी - १९.३५

पोटात दुखणे, पोट वाढणे - १६.३५

पोटाचा फैलाव - १६.१३

पोटात दुखणे, थकवा,

सूज, वजन कमी होणे - ०९.६८

पोटात दुखणे, रक्तस्त्राव - ६.४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: कल्याण लोकसभेत सगळे रेकॉर्ड मोडा, गुलाल उधळायला मी स्वतः येणार!

Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच भररस्त्यात प्रियकराला भोसकले

LED Screen Cleaning: घरगुती वस्तूंनी LED स्क्रीन करा स्वच्छ, फक्त करू नका 'या' चुका

Madgaon Express: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत

SCROLL FOR NEXT