Mental Health Tips esakal
लाइफस्टाइल

Mental Health Tips : छोट्या-मोठ्या कामांमुळे ताण येतोय? मग, ‘या’ टिप्सची घ्या मदत

शारिरीक आरोग्यासोबतच आपले मानसिक आरोग्य चांगले असणे हे फार महत्वाचे आहे. जेव्हा आपण शारिरीक रित्या आणि मानसिक रित्या मजबूत असू तेव्हा याचा आपल्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Mental Health Tips : शारिरीक आरोग्यासोबतच आपले मानसिक आरोग्य चांगले असणे हे फार महत्वाचे आहे. जेव्हा आपण शारिरीक रित्या आणि मानसिक रित्या मजबूत असू तेव्हा याचा आपल्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे, शारिरीक आरोग्यासोबत तुमचे मानसिक आरोग्य मजबूत असणे हे फायद्याचे ठरते.

रोजच्या दैनंदिन जीवनात घरातील छोटी-मोठी कामे आपण करतो. विशेषत: अनेक महिलांना घरातील कामे करून नोकरी करावी लागते. मात्र, ही घरातील छोटी-मोठी कामे केल्याने किंवा काही गोष्टींमुळे व्यक्ती तणावाखाली येते.

या ताण-तणावाचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे, हा ताण-तणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही काही चांगल्या सवयींचा तुमच्या आयुष्यात समावेश करणे फार महत्वाचे आहे. कोणत्या आहेत या सवयी? चला तर मग जाणून घेऊयात.

संतुलित आहार

निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल तर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच, याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर ही होऊ शकतो. त्यामुळे, नियमितपणे संतुलित आहार घेणे हे फायद्याचे ठरते. (A balanced diet)

या संतुलित आहारामध्ये तुम्ही कर्बोदके, व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, डाळी, दूध, धान्य, हेल्दी फॅट्स इत्यादींनी युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. यामुळे, तुमचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

व्यायाम आहे महत्वाचा

संतुलित आहारासोबतच तुम्ही नियमितपणे व्यायाम करणे हे तुमच्या निरोगी जीवनशैलीसाठी महत्वाचे ठरते. संतुलित आहाराला जर तुम्ही व्यायामाची जोड दिली तर शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. (Exercise is important)

जर तुम्ही दिवसभर घरात फक्त बसून राहत असाल तर तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, शरीर सक्रिय ठेवण्यासाठी व्यायाम फार महत्वाचा आहे. तुम्ही नियमितपणे शारिरीक हालचाल केली तर आपल्या शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते.

कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींशी बोला

आपल्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी यांचा समावेश असणे फार महत्वाचे आहे. कारण, जेव्हा तुम्ही मानसिक तणावामध्ये असता तेव्हा त्या गोष्टी शेअर करण्यासाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांची किंवा तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची मदत घेऊ शकता. (Talk to family and friends)

त्यांच्यासोबत तुमच्या मनातील गोष्टी शेअर केल्याने मन हलके होण्यास मदत होते, आणि तुमच्या मनावरील ताण कमी होऊ शकतो. शिवाय, यावर तुमचे कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रिणी तुम्हाला काही चांगला सल्ला देऊ शकतील किंवा काही मदत करतील. त्यामुळे, कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा, त्यांच्याशी बोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT