Skin Care Tips  Sakal
लाइफस्टाइल

Natural Face Glow Tips चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? मग घरीच करा हे नैसर्गिक उपाय

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असल्यास आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये या नैसर्गिक औषधोपचारांचा समावेश करावा.

Harshada Shirsekar

Skin Care Tips चेहऱ्यावर नॅचरल ग्लो कसा येईल? यासाठी महिलांप्रमाणेच पुरुषही कित्येक उपाय करत असतात. पण ही मंडळी करत असलेल्या उपचारांमध्ये सातत्य पाहायला मिळत नाही. केवळ एक-दोन दिवस उपाय केल्यास त्वचेमध्ये फरक दिसणार नाहीत, हे लक्षात घ्या मंडळींनो.

दुसरीकडे बाजारातील केमिकलयुक्त क्रीमचा वापर चेहऱ्यासाठी मुळीच करू नये. कारण यामुळे दीर्घकाळासाठी फायदे मिळणार नाहीत शिवाय त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्वचेला दीर्घकाळासाठी लाभ हवे असल्यास स्किन केअर रूटीनमध्ये नैसर्गिक उपचारांचा समावेश करावा.  चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती… 

बदामाचे तेल

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा व मानेवर बदामाचे तेल लावा व हलक्या हाताने मसाज करावा. त्वचेचा पोत व रंग उजळण्यासाठी बदामाचे तेल लाभदायक ठरू शकते. या तेलामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेवरील जखमा भरण्यास मदत मिळते. 

बेसन व दुधाचे फेसपॅक

त्वचेवर नॅचरल ग्लो हवा असल्यास बेसन व कच्च्या दुधाचे फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावा.  त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी फार पूर्वीपासून स्किन केअर रूटीनमध्ये या फेसपॅकचा वापर केला जात आहे. बेसनमधील गुणधर्मामुळे त्वचा स्वच्छ व एक्सफोलिएट होण्यास मदत मिळते. 

मुलतानी माती 

मुलतानी मातीमध्ये कच्चे दूध मिक्स करून लेप तयार करा आणि २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. लेपाचा थर जाडसर ठेवावा कारण मुलतानी माती सुकल्यानंतर त्वचा खेचली जाते, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्यांची समस्या निर्माण होऊ शकतात.

आयुर्वेदिक उपचारांमध्ये मुलतानी मातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे तेलकट त्वचेची समस्या कमी होऊन चेहरा फ्रेश व मऊ होण्यास मदत मिळू शकते. 

संत्र्याच्या सालीची पावडर 

बहुतांश जण स्किन केअर रूटीनमध्ये संत्र्याच्या सालीचाही समावेश करतात. यामध्ये अँटी- एजिंग आणि अँटी- रिंकल यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

संत्र्याच्या सालीची पावडर व कच्चे दूध एकत्रित मिक्स करा व पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करावा. आठवड्यातून दोनदा आपण हा उपाय करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Sends Notice to South Indian Stars: साउथ इंडियन फिल्मस्टार विजय देवरकोंडा, राणा दग्गुबत्ती, प्रकाश राज 'ED'च्या रडारावर!

Prithvi Shaw: भारताच्या क्रिकेटरनं तब्बल १७ किलो वजन केलं कमी! पीटरसन म्हणतोय, 'पृथ्वी शॉला कोणीतरी हे दाखवा'

Manikrao Kokate Rummy Video: कोकाटेंचा 'पत्ते', तटकरेंच्या अंगावर, चव्हाणांचा राडा, दादांना गोत्यात आणणार?

Crime News : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; मृतदेह टाकला उसाच्या शेतात, तोंडावर वर्मी घाव, मुलगा आहे सैन्य दलात

ट्रम्प यांच्या दाव्यावरून गोंधळ, १ विधेयक मंजूर, न्यायमूर्तींना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव अन्...; संसदेत पहिल्या दिवशी काय घडलं?

SCROLL FOR NEXT