Kolhapur Loksabha Election  esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Loksabha : कोल्हापूरची जागा राखण्याचं महायुतीसमोर मोठं आव्हान; 'या' नेत्यांना पाळावा लागणार पक्षाचा आदेश

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास १९९९ पासून नेहमीच चर्चेत राहणारा आहे.

निवास चौगले

सद्य:स्थितीत कोल्हापूरची जागा महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आहे.

Kolhapur Loksabha Election : राज्यातील सत्तांतराचे जिल्ह्यात उमटलेले पडसाद, त्यातून राष्ट्रवादी व शिवसेनेत पडलेली फूट, निवडून आणण्यापेक्षा एखाद्याची जिरवायलाच होणारे मतदान हा जिल्ह्याचा पूर्वेतिहास, विद्यमान खासदारांविषयी नाराजी आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकसभेची कोल्हापूरची जागा राखण्याचे आव्हान महायुतीसमोर असेल.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास १९९९ पासून नेहमीच चर्चेत राहणारा आहे. देशात एक निकाल आणि या मतदारसंघात त्याच्या उलटा निकाल असेच समीकरण सातत्याने राहिलेले आहे. त्यामुळे यावेळीही कोण कोणाला निवडून आणणार, यापेक्षा कोण कोणाला पाडणार, याचीची उत्सुकता जास्त असेल. सद्य:स्थितीत ही जागा महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आहे.

२०१९ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून विजयी झालेले खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी श्री. शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या जोरावर या जागेवर शिंदे गटाकडून हक्क सांगितला जात आहे. शिंदे गटाला ही जागा मिळाली, तर सद्य:स्थितीत त्यांच्याकडे प्रा. मंडलिक वगळता अन्य प्रबळ उमेदवार नाही. त्यांनीही लढण्यासाठी शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला देऊन त्यावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जवळ जवळ निश्‍चित मानली जात आहे.

दुसरीकडे हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन लढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्याकडून समरजितसिंह घाटगे यांना मैदानात उतरवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या एकूण वाटचालीची सूत्रे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडेच राहणार आहेत. गेल्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्यांनी प्रा. मंडलिक निवडून आले.

त्या तुलनेत त्यांच्याकडून फारशा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. कोल्हापूरची जागा शिवसेनेलाच मिळणार व आपणच उमेदवार असणार, असे सांगत ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी जिल्हाभर फलक लावले. त्यांचीही या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची असेल. काँग्रेसकडून इच्छुक असलेले बाजीराव खाडे असो किंवा राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, यांना पक्षाचे आदेश पाळावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?

IND vs PAK T20 WC: इशान किशनची फटकेबाजी, भारताने उभे केले सर्वात मोठे लक्ष्य; पाकड्यांनी ६ स्पिनर्स वापरले, तरीही...

Mulund: २ कोटींची भरपाई, सरकारी नोकरी अन्...; मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या रामधनींच्या कुटुंबियांच्या मागण्या काय?

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT