Satara Lok Sabha mahayuti candidate Udayanraje Bhosale esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

तत्पूर्वी सकाळी जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी त्यांचे औक्षण केले.

सातारा : लोकसभा (Satara Lok Sabha) निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झालीये. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे.

या प्रमुख लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान, उदयनराजे यांच्यासह त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले (Rajmata Kalpana Raje Bhosale), पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. आणि त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.

तत्पूर्वी सकाळी जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी त्यांचे औक्षण केले. तद्नंतर साताऱ्यातील अनंत इंग्लिशस्कूल शाळेत जाऊन उदयनराजेंसह राजमाता कल्पनाराजे, दमयंतीराजे भोसले यांनी बरोबर सात वाजून सात मिनिटांनी मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

BABAR AZAM: पहिल्या टेस्टमधून बाहेर, पण आता कमबॅकसाठी सज्ज? बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने दिली मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर धरणार, हवामान विभागाचा अंदाज

Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT