Satara Lok Sabha constituency  MLA Balasaheb Patil
Satara Lok Sabha constituency MLA Balasaheb Patilesakal

Satara Lok Sabha : 'शरद पवारांकडून उमेदवारी मिळालेला नेता विजयी होणार'; माजी सहकारमंत्र्यांना विश्वास

सातारा जिल्ह्याबरोबर देशातील जनतेला दिलासा देण्याचे काम इंडिया आघाडीच्या माध्यमातून होणार आहे.
Summary

शरद पवार यांनी माथाडी कामगारांसाठी काम करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

कराड : सातारा जिल्ह्याबरोबर देशातील जनतेला दिलासा देण्याचे काम इंडिया आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. निश्चित देशांमध्ये वेगळे वातावरण दिसेल. सातारा जिल्ह्यामध्ये चांगले वातावरण असून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) चांगल्या मतांनी निवडून येतील, असा विश्वास माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी व्यक्त केला.

माजी सहकार मंत्री आमदार पाटील यांनी कराड नगरपालिका शाळेमध्ये मुलगा जशराज पाटील यांच्यासमवेत मतदान केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा सातारा मतदारसंघ आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारावर वाटचाल करणारा हा सातारा मतदारसंघ आहे.

Satara Lok Sabha constituency  MLA Balasaheb Patil
रामराजेंपासून उदयनराजेंपर्यंत.. सातारा-माढा मतदारसंघात राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

सातारा जिल्ह्याचे बहुतांश प्रश्न सोडवण्याचे काम शरद पवारांच्या माध्यमातून झाले आहे. शरद पवार यांनी माथाडी कामगारांसाठी काम करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सातारा जिल्ह्याबरोबर देशातील जनतेला दिलासा देण्याचे काम इंडिया आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. निश्चित देशांमध्ये वेगळे वातावरण दिसेल. सातारा जिल्ह्यामध्ये चांगले वातावरण असून शशिकांत शिंदे चांगले मतांनी निवडून येतील, असा विश्वास माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

Satara Lok Sabha constituency  MLA Balasaheb Patil
Satara Lok Sabha : साताऱ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल; माजी मुख्यमंत्र्यांना विश्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com