Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : सातारा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही; शिवेंद्रसिंहराजेंनी कोणाला दिलं आव्हान?

पूर्वी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटले जायचे. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

'अद्याप महायुतीच्या जागा वाटपात साताऱ्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही; पण जो कोणी आमचा उमेदवार असेल तो उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येईल.'

सातारा : सध्या जिल्ह्यात भाजपची (BJP) ताकद वाढली असून, त्यातूनच आम्हाला भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे. पूर्वी सातारा (Satara Lok Sabha) जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटले जायचे. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी व्यक्त केले.

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या शक्तिप्रदर्शनावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी टिप्पणी केली आहे. आमदार शशिकांत शिंदेंच्या आजच्या शक्तिप्रदर्शनाचे तुम्हाला आव्हान वाटते का, या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘आव्हान देण्यासाठीच निवडणुका असतात; पण भारतीय जनता पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. त्यातूनच आम्हाला भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे.

सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वाढलेली ताकद लक्षात घेता आमची मागणी होती, की महायुतीत सातारा लोकसभेची जागा ही भाजपकडे राहावी, अशी आमची मागणी आहे. पूर्वी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटले जायचे. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही, हे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजपचे गावपातळीवर काम करणारे छोटे कार्यकर्ते असतील. त्यांना ते पदाधिकारी झाले नसतील तसेच राजकारणात मोठे झालेले नसतील; पण त्यांची सगळ्यांची मागणी होती, की साताऱ्याची ही जागा भाजपनेच लढली पाहिजे.

अद्याप महायुतीच्या जागा वाटपात साताऱ्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही; पण जो कोणी आमचा उमेदवार असेल तो उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येईल. राहिला विषय आव्हानाचा, आव्हान देण्यासाठीच निवडणुका असतात. पक्षाची ताकद वाढली आहे, त्यातूनच आम्हाला भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT