'आताचे शाहू महाराज दत्तक आहेत, ते खरे वारसदार नाहीत'; मंडलिकांच्या वादग्रस्त वक्तव्याचे कोल्हापुरात तीव्र पडसाद

प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी मांडले. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे केलेल्या या वक्तव्यावरून जिल्ह्यात वादाची ठिणगी पडली आहे.
Kolhapur Lok Sabha Sanjay Mandlik Shahu Maharaj
Kolhapur Lok Sabha Sanjay Mandlik Shahu Maharajesakal
Summary

‘शाहू छत्रपती महाराजांवर आक्षेपार्ह विधान करून मंडलिकांनी मोठी चूक केली आहे.'

कोल्हापूर : आताचे शाहू महाराज (Shahu Maharaj) हे दत्तक आहेत, ते खरे वारसदार नाहीत, तुम्ही-आम्हीच राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार असल्याचे मत महायुतीचे कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी मांडले. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे केलेल्या या वक्तव्यावरून जिल्ह्यात वादाची ठिणगी पडली असून, प्रा. मंडलिक यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शाहूप्रेमींनी दसरा चौकात (Dasara Chowk) जोरदार निदर्शने केली.

प्रा. मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीचा अवमान केला असून, त्याला जनता मतपेटीतून उत्तर देईल, असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

Kolhapur Lok Sabha Sanjay Mandlik Shahu Maharaj
Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात मोदी-शहा आले तरी फरक पडणार नाही; सतेज पाटलांचं खुलं आव्हान

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी दसरा चौकात जमून खासदार मंडलिक यांच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. तसेच मंडलिकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणीही केली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या मेळाव्यात खासदार मंडलिक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या दत्तक प्रकरणावरून टीका केली होती. याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले.

महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सायंकाळी दसरा चौकात जमा झाले. येथे मंडलिकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. जय भवानी..., जय शिवाजी..., छत्रपती शिवाजी महाराज की जय..., राजर्षी शाहू महाराज की जय...., शाहूंविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मंडलिकांचा धिक्कार असो....अशा घोषणा दिल्या.

Kolhapur Lok Sabha Sanjay Mandlik Shahu Maharaj
Kolhapur Lok Sabha : 'राज्यात महायुतीचे 45, तर देशात NDA चे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील' - शंभूराज देसाई

मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘मंडलिकांनी शाहू महाराजांवर आक्षेपार्ह विधान करून तमाम शाहूप्रेमींसह कोल्हापूरकरांचा अपमान केला आहे. ज्या छत्रपती घराण्याने सर्व देशाला सामाजिक समतेचा संदेश दिला. त्या घराण्यातील व्यक्तीबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. अशा प्रकारे वल्गना करून मंडलिक निवडणूक वेगळ्या वळणावर नेणार असतील, तर याद राखा. हे विधान झाले त्यावेळी उपस्थित असणाऱ्या मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांनीही खुलासा करण्याची गरज आहे.’

शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा संपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा विजय निश्‍चित झाला आहे. त्यामुळे भाजप व मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळेच अशा पद्धतीची विधाने करून निवडणूक वेगळ्या वळणावर नेली जात आहे. हिंमत असेल तर बिंदू चौकात येऊन असे वक्तव्य करावे. या वक्तव्याबद्दल मंडलिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक करावी.’माकपचे नेते चंद्रकांत यादव म्हणाले, मंडलिकांनी कोल्हापूरच्या जनतेचा अवमान केला आहे. याबद्दल मंडलिकांनी माफी मागावी.

Kolhapur Lok Sabha Sanjay Mandlik Shahu Maharaj
'..जर मिठाचा खडा पडला, तर कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही'; अजितदादांच्या भाषणाचा स्टेटस् ठेऊन सामंतांचा कोणाला इशारा?

माजी नगरसेविका भारती पोवार म्हणाल्या, ‘शाहू छत्रपती महाराजांवर आक्षेपार्ह विधान करून मंडलिकांनी मोठी चूक केली आहे. त्यांचे वडील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक जिवंत असते, तर त्यांना हे सहन झाले नसते.’ आर. के. पोवार, कॉ. दिलीप पवार, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विक्रम जरग, सचिन चव्हाण, राजू लाटकर, शारंगधर देशमुख, राजाराम गायकवाड, रमेश पोवार, महादेव पाटील, प्रा. सुभाष जाधव, रणजित पोवार, प्रदीप शेलार, संपतराव चव्हाण-पाटील, सुनीता पाटील, अजित खराडे, चंद्रकांत पाटील, अवधूत पाटील, तौफिक मुल्लाणी, रियाज सुभेदार, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, गणेश शिंदे, अमर समर्थ आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com