Shiv Sena leader Sanjay Raut esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : सांगली काँग्रेसचा गड, मग मतदारसंघात RSS आमदार कसा होतो? संजय राऊतांचा थेट सवाल

सांगलीत काँग्रेसने नाराजी दाखवली, तर शिवसेना कोल्हापुरात नाराजी दाखवेल, असा इशारादेखील राऊत यांनी दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शिवसेनेला संपूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

सांगली : सांगली (Sangli Lok Sabha) हा जर काँग्रेसचा (Congress) गड असेल, तर खुद्द सांगली विधानसभा मतदारसंघात संघाचा माणूस आमदार कसा होतो? मिरजेत भाजप (BJP) कशी जिंकते? दहा वर्षे भाजपचा खासदार कसा निवडून येतो, असा सवाल करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता सांगली जिंकायची असेल तर शिवसेनाच हवी, अशी भूमिका मांडली.

सांगलीत काँग्रेसने नाराजी दाखवली, तर शिवसेना कोल्हापुरात नाराजी दाखवेल, असा इशारादेखील राऊत यांनी दिला आहे. विशाल पाटील यांनी २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. ती चूक त्यांना कळली आहे. यावेळी पुन्हा तशी चूक ते करणार नाहीत, असा विश्‍वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले, ‘विश्‍वजित किंवा विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजून घेतो. ते काँग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षे काँग्रेसचे काम करत आहेत. गेल्या काही वर्षांत सांगलीत जातीयवादी शक्तींना स्थान मिळाले आहे. प्रत्यक्ष सांगलीत संघाचा माणूस निवडून येतो. मिरजेत दंगली घडवल्या जातात, तेथेही संघाचा माणूस निवडून येतो. विशाल, विश्‍वजित यांना हे माहिती आहे.

भाजपचे खासदार १० वर्षे निवडून येत आहेत. त्यांच्याशी टक्कर घ्यायची असेल, तर तेथे शिवसेनेचा उमेदवार लढला पाहिजे, ही जनभावना आहे. तेथे काँग्रेस परंपरेने काम करत आहे. वसंतदादा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचा प्रभाव आहे; परंतु आज या शक्तींशी मुकाबला करायला शिवसेना हवी, ही गरज आहे. त्यासाठी चंद्रहार पाटील उमेदवार आहेत. शिवसेना ताकदीने तेथे उभी आहे.’

जयंत पाटील यांचा पूर्ण पाठिंबा

सांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शिवसेनेला संपूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ते म्हणाले, ‘माझे जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. राष्ट्रवादी आमच्या पाठीशी ठामपणे आहे. पवारसाहेबांनीही तसे सांगितले आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT