Loksabha 2019

Loksabha 2019 : भाजप-सेनेचे मंत्री जुमलेबाज : अशोक चव्हाण

सकाळवृत्तसेवा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एनडीए सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. मताचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या सरकारने केले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच भाजप-सेनेचे मंत्री जुमलेबाज आहेत, असेही ते म्हणाले.

महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह महाआघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. मात्र, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेला दांडी मारली. 

चव्हाण म्हणाले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्वांना न्याय देण्याचा भावनेतून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. अजूनही काही पक्षांनी या महाआघाडीत सहभागी होण्याची आमची अपेक्षा होती. भाजपकडून साम, दाम, दंड भेद वापरून काही पक्षांना अडवत आहे. भाजप-शिवसेनेने दिलेली एकही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम गेल्या पाच ववर्षांत झाले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, जुमलेबाजी सुरु आहे, युतीचे मंत्री जुमलेबाज आहेत. सत्तेत असलेल्या भाजपने जातीयवाद पसरविण्याचे काम यांनी केले आहे. राजकीय फायद्यासाठी दंगली घडवून आणल्या. या सरकारने देशात बेरोजगारांची फौज निर्माण केली आहे. कृषीव्यवस्था उद्ध्वस्त करून शेतकरी अवस्था वाईट केली आहे. कर्जमाफीचा फायदा अद्याप सरकारला मिळालेला नाही. मराठा समाज आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT