congress
congress 
Loksabha 2019

Loksabha 2019 : पुण्यात काँग्रेसमध्ये निष्ठावंतांचा जोर

सकाळवृत्तसेवा

पुणे : भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर केल्याने पुण्यातील काँग्रेस उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. काँग्रेस निष्ठावंतांनी दिल्लीत ठिय्या ठोकला असून नगरसेवक अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी आणि प्रवीण गायकवाड यांच्यात चुरस आहे. पुण्यातील उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. 

भाजपने अपेक्षेप्रमाणे बापट यांचे नाव जाहीर केल्याने काँग्रेसचा उमेदवार कोण याविषयी उत्सुकता वाढली आहे. शुक्रवारी रात्री काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक रात्री दोनपर्यंत चालली पण त्यात पुण्याचा निर्णय झाला नाही. पुण्यातील सर्व इच्छुक गेली दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. यात मोहन जोशी, अरविंद शिंदे, अभय छाजेड, शहराध्यक्ष रमेश बागवे आदींचा समावेश आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला आहे. भाजपने बापट यांना उमेदवारी दिल्याने मराठा समाजाचे अरविंद शिंदे या तरुण चेहेऱ्याला संधी द्यावी या मागणीला जोर आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. 

दुसरीकडे प्रवीण गायकवाड हेही दिल्लीत असून, त्यांनी पुण्यात नवीन प्रयोग म्हणून आपल्याला संधी द्यावी असा आग्रह धरला आहे. गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, पण हाच मुद्दा निष्ठावंतांनी लावून धरला असून, पवारांच्या उमेदवाराला तिकीट का असा सवाल काँग्रेस निष्ठावंत करीत आहेत. नगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध ताणले गेल्याने पुण्याबाबत पवार यांचा सल्ला मानण्यास काँग्रेस तयार नसल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यालाच उमेदवारी याला जोर आला असून, त्यात कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय येत्या एक दोन दिवसांत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT