Loksabha 2019

Loksabha 2019 : 'पंतप्रधान मोदी दहशतवादी'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक कट्टर दहशतवादी आहेत. ते एक चांगले नागरिक नाहीत. तुम्ही जर नरेंद्र मोदी यांना मतदान केले तर नव्या समस्या निर्माण होतील, अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. तसेच मोदींनी तिहेरी तलाक कायदा आणला आणि तुरुंगात पाठविण्याची योजना आखली, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी चंद्राबाबू नायडू यांची तुलना 'बाहुबली' चित्रपटात विरोधी भूमिका करणाऱ्या भल्लाळदेवशी केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या चंद्राबाबू यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ''नरेंद्र मोदी हे नागरिक म्हणून चांगली व्यक्ती नाही. ते एक कट्टर दहशतवादी आहेत. त्यामुळे मी माझ्या अल्पसंख्यांक बंधू आणि भगिणींना सांगू इच्छितो, की जर तुम्ही नरेंद्र मोदींना मतदान केले तर नव्या समस्या निर्माण होतील. नरेंद्र मोदींनीच तिहेरी तलाक कायदा आणला असून, यामधून तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची योजना आखली''.

तसेच ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा मी पहिला व्यक्ती होतो. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अल्पसंख्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT