Loksabha 2019

Loksabha 2019 : राज ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (बुधवार) भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 

राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी मोदींविरोधात लढायचे असे सांगत याचा फायदा ज्या पक्षाला व्हायचा त्यांना होऊ द्या, असे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र, राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार का, याबाबत राजकीय चर्चाँना उधाण आले आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनीही शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT