Ashadhi Ekadashi esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंच्या 4 पिढ्यांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा अनोखा योग

आज आषाढी एकादशी असून, या एकादशीला अत्यंत महत्व आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज आषाढी एकादशी असून, या एकादशीला अत्यंत महत्व आहे.

Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी असून, या एकादशीला अत्यंत महत्व आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं. श्री विठ्ठल समस्त वारकरी सांप्रदायिकांसह सर्वांचेच आवडते दैवत असल्याने कोरोनाच्या अडसरानंतर यंदाची एकादशी भाविकांसाठी उदंड उत्साहाची ठरणार आहे. यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर इथं गेल्या आहेत. (Vitthal Rukmini Puja CM Eknath Shinde pandharpur temple)

दरम्यान, आज (रविवार) पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. यंदा आषाढीला कोविड-19 नियमांचं बंधन नव्हतं. तब्बल दोन वर्षांनी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर वारकरी भावूक झाले. दिल्ली दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री पुणेमार्गे पंढरपूरमध्ये पोहोचले. रात्री 2 वाजता मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहातून विठ्ठल मंदिराकडे निघाले. पहाटे अडीच वाजता महापूजेला सुरुवात झाली. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि अन्य कुटुंबीयही उपस्थित होते.

4 पिढ्यांबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता शिंदे हसतमुखानं म्हणाले, हे भाग्य सर्वांनाच मिळावं. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदेंसह त्यांचा मुलगा आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा 4 पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ४ पिढ्यांनी दर्शन घेतलेले बहुधा पहिले मुख्यमंत्री असावेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा हा अनोखा योगायोग मानावा लागेल.

बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

महापूजेला मानाचे वारकरी होण्याचा मान बीड जिल्ह्यातील नवले दाम्पत्याला मिळालाय. मुरली नवले (वय ५२) आणि जिजाबाई नवले (वय २७) हे गेवराई तालुक्यातील रूई गावातील आहेत. गेल्या २० वर्षांपासून नवले दाम्पत्य पंढरीची वारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT