
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेची मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सपत्निक महापूजेला सुरुवात झालीय.
Ashadhi Ekadashi : शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न, सर्वांगीण विकासाचं साकडं
Ashadhi Ekadashi 2022 CM Eknath Shinde
पंढरपूर : शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, व्यावसायिक, उद्योजक यांच्यासह समाजातील सर्व घटकांना सुख समृध्दी लाभू दे, राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे, कोविडचे संकट कायम स्वरुपी जाऊ दे असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे वेळी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. (Pandharpur Vitthal Temple Puja)
शिंदे म्हणाले, आजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा, महत्वाचा दिवस आहे. पांडुरंगाची कृपा, आई वडीलांची पुण्याई यांच्या मुळे आज महाराष्ट्रारातील बारा कोटी जनतेच्या वतीने आपल्याला पूजा करण्याची संधी मिळाली. लाखो वारकरी दरवर्षी पायी पंढरीची वारी करत असतात. दोन वर्षे कोरोनामुळे वारकरी या वारीत सहभागी होऊ शकले नव्हते परंतु यंदा दहा लाखाहून अधिक वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. उशीरा का होईना राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जास्ती पाऊस पडत आहे परंतु कुठेही जीवीतहानी होऊ नये यासाठी शासन काळजी घेत आहे.
हेही वाचा: Ashadhi Ekadashi : बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी
शिंदे म्हणाले, बळीराजा पावसामुळे सुखावतोय. तथापी यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी राज्य सरकार कटिबद्द राहील. मध्यंतरी खंडीत करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना सुरु करण्याचा निर्णय आम्ही पहिल्याच कॅबिनेट मध्ये घेतला आहे. त्याच बरोबर समुद्राला जाणारे पावसाचे पाणी मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे.
शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आम्ही भेट घेतली. राज्याचा उत्कर्ष करण्यासाठी, विकास करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसह सर्वांना चांगले दिवस येण्यासाठी चांगल्या योजना राबवा. केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल याची ग्वाही मोदी यांनी दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा: वारकऱ्यासांठी विकास आराखडा तयार करणार : CM एकनाथ शिंदे
जनतेच्या आशिर्वादामुळे आज आपल्याला पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार , गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, सर्व थोरामोठ्यांचे आशिर्वाद अाणि माझ्या पन्नास आमदारांचे सहकार्य यांच्यामुळे ही संधी मिळाली आहे हे आपण कधीही विसरणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जुन नमूद केले.
Web Title: Ashadhi Ekadashi 2022 Puja Cm Eknath Shinde Pandharpur Vitthal Rukmini Temple Wari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..