Sugar esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : रेशन दुकानातून वर्षभरामध्ये साखरेची पुरेशी उपलब्धता; 330 लाख टन उत्पादनाचा टप्पा पार

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News : सणासुदीच्या काळात रेशन दुकानातून साखर उपलब्ध व्हावी यासह वर्षभर पुरेशा साखरेची उपलब्धता राहील, अशी व्यवस्था देशात करण्यात आली आहे.

ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या हंगामात देशात इथेनॉल उत्पादनासाठी लागणाऱ्या ४३ लाख टन वगळता ३३० लाख टन साखरेचा उत्पादन टप्पा पूर्ण झाला आहे. गेल्या पाच वर्षांच्या साखर हंगामातील हा दुसरा क्रमांक राहिला.

साखर उपलब्धतेसह ऊसाची देणी भागविण्याची खातरजमा करून देशाने निर्यातीचा कोटा ६१ लाख टन मर्यादित ठेवला आहे. (Adequate availability of sugar throughout year from ration shops in country maharashtra news)

त्यामुळे गेल्या महिन्याच्या अखेरीस ८३ लाख टन साखरेची साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा साडेतीन महिन्यांसाठी पुरेसा ठरेल, असे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.देशात या महिन्यात पाऊस सामान्य राहिला. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उसाच्या क्षेत्रात पाऊस पडला. त्यामुळे आगामी २०२३-२३ हंगामात उत्पन्न वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्याच्या ऊस आयुक्तांनी पिकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवावे, उसाखालील क्षेत्र आणि उत्पादनासह साखरेच्या उत्पादनाची अद्ययावत माहिती ठेवावी, असे सुचविण्यात आले आहे. त्यातून केंद्र सरकारला पुढील हंगामासाठी साखर निर्यात धोरणाबाबत निर्णय घेता येईल. अतिरिक्त साखर उपलब्ध झाल्यावर निर्यातीसाठी परवानगी देण्यात येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केंद्राने मागवली माहिती

देशातील विविध भागांमध्ये साखरेच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा उभारता यावी म्हणून विविध साखर कारखान्यांकडील व्यापाऱ्यांशी संबंधित माहिती केंद्र सरकारने मागवली आहे. उद्योग संघटनांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये पुरेशा साठ्याची पुष्टी केली.

हंगामाच्या शेवटी साखरेचा पुरेसा साठा शिल्लक ठेवल्याने कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली राहिली आहे याचे कौतुक केले. सरकार आणि उद्योगाच्या सामुहिक प्रयत्नांमुळे कारखान्यांनी १ कोटी ७ हजार रुपयांहून अधिक देणी म्हणजे, सध्याच्या हंगामातील उसाच्या थकबाकीपैकी ९४ टक्के देण्यात आली आहेत, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT