महाराष्ट्र

आणखी २०० जिल्ह्यांत कृषी हवामान सल्ला केंद्रे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हवामान खात्यातर्फे शेतकऱ्यांना दिला जाणारा कृषी हवामान सल्ला देशभरातील आणखी दोनशे जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय हवामान खात्याने घेतला आहे. त्यासाठी या जिल्ह्यांमध्ये कृषी हवामान सल्ला केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. 

‘‘शेतकऱ्यांनी कोणत्या हंगामात नेमके कोणते पीक घ्यावे. त्या पिकांवर कोणत्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करावी. पिके घेण्यास कोणते हवामान अनुकूल आहे. तसेच, सध्याचे हवामान कसे आहे, अशा वेगवेगळ्या घटकांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी यापूर्वीच देशातील १३० जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने कृषी हवामान सल्ला केंद्रे सुरू केली आहेत. त्याचा विस्तार करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. त्यामुळे आता देशातील आणखी दोनशे जिल्ह्यांपर्यंत हा कृषी सल्ला पोचला जाईल,’’ असा विश्‍वास हवामान खात्याचे कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कृपान घोष यांनी व्यक्त केला. 

हवामान विभागाच्या वतीने ‘बदलत्या हवामानातील नवीन सुधारणा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै, हवामानतज्ज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव, डॉ. ए. कश्‍यपी, डॉ. पी. गुहाटाकुर्ता, डॉ. एस. एन दुत्ता, यु. आर. जोशी उपस्थित होते. 

घोष म्हणाले, ‘‘देशभरातील १३० पैकी महाराष्ट्रात वाशीम, भंडारा, नागपूर, बुलडाणा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही केंद्र कार्यान्वित झाली आहेत. आणखीन नऊ जिल्हयांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील. त्यामध्ये पुण्यासह सिंधुदुर्ग, दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक (इगतपुरी), परभणी, राहुरी (नगर), अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना हवामानासंबंधीची माहिती देण्यासाठी टप्प्याटप्प्याने ही केंद्रे कार्यान्वित होत आहेत. 

५३ लाख शेतकरी घेतात ‘किसान पोर्टल’चा लाभ 
सध्या ‘किसान पोर्टल’ आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरून दररोजच्या हवामानाची माहिती शेतकऱ्यांच्या मोबाईल फोनवर ‘एसएमएस’च्या माध्यमातून देण्यात येते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाजही यातून देण्यात येतो. महाराष्ट्रात ५३ लाख शेतकरी या सुविधेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मराठी भाषेत दररोजच्या हवामानाचा अंदाज देण्यात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT