Rahul Gandhi News esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi News: हिंदू महासंघ राहुल गांधींना पाठवणार अंदमानचं तिकीट; सावरकर प्रकरण भोवणार?

सावरकर प्रकरण भोवणार?

सकाळ डिजिटल टीम

मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची माफी मागण्यास राहुल गांधींना सुचवलं जात असतानाच त्यांनी 'माफी मागायला माझं आडनाव सावरकर नाही, गांधी आहे' असं म्हणत आगीत तेल ओतलं होतं. हे प्रकरण आता चांगलंच चिघळलं आहे. दरम्यान, हिंदू महासंघाकडून राहुल गांधी यांच्यासाठी अंदमानचं तिकीट काढण्यात आलं आहे. (anand dave will send ticket to Andaman to Rahul Gandhi Savarkar Row )

हिंदू महासंघ आज राहुल गांधी यांना अंदमान ची तिकीटे पाठवणार असून त्यांनी एक दिवस त्या कोठडीत राहून दाखवावे असे आव्हान हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे.

8 ft X 9 ft च्या काळ्या कोठडीत, 11 वर्ष राहून, एकाच भांड्यात प्रात विधी आणि जेवण करून, अगदी आत्महत्या करण्याचे विचार मनात येऊन सुद्धा महाकाव्य लिहिणारे, तेथील कैद्यांना शिक्षण देणारे, अंधश्रद्धा घालवणारे वीर सावरकर जर समजायचे असतील, त्यांचा त्याग समजून घ्यायचा असेल तर एक दिवस तरी त्या कोठडित रहा, असे दवे यांनी म्हटलं आहे.

आजींचे संस्कार झाले असते तर राहुलजी असे बोललेच नसते, अशी टीकाही राहुल गांधी यांच्यावर करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली खासदारकी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राजस्थान व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आलेले राहुल माफी मागण्याच्या मुद्द्यावर म्हणाले, ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT