खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींच्या वाटेला आणखी किती अडचणी येणार? ज्योतिषी म्हणतात...: Rahul Gandhi Astrology | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Astrology

Rahul Gandhi Astrology: खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींच्या वाटेला आणखी किती अडचणी येणार? ज्योतिषी म्हणतात...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरत कोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. (Rahul Gandhi Astrology )

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावरुन एक टिप्पणी केली होती. यामध्ये दोषी मानून कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार होते.

तर दुसरीकडे लंडन येथे केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, यासाठी भाजप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. संसदेतही भाजपने हा मुद्दा लावून धरला होता. दोन वर्षाची शिक्षा अन् खासदारकी गमावली. राहूल गांधींच्या ग्रहयोगाविषयी ज्योतिषी काय म्हणतात ते जाणून घेऊ.

सध्याची परिस्थिती पाहता राहुल गांधींसाठी हा काळ खूपच कठीण दिसत आहे. डॉ नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचे ग्रहयोग ठीक नाहीत त्यामुळे अशुभ शुक्र आणि राजयोग नाश करणारा शनी त्यांच्या राशीत भ्रमण करत आहे.

तसेच त्यांचे राजकारणातील बालिश बोलणे पक्षाला अडचणीत आणेल. त्यांचे प्रभुत्व कमी होईल. असहे धारणे यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण?

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.(Marathi Tajya Batmya)

राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं.

दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र त्यांची खासदारकी गेली. लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली.

टॅग्स :BjpRahul GandhiCongress