Anil Deshmukh Anil Deshmukh
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज (Bail application) दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयात सोमवारी (ता. १४) सुनावणी झाली. सीबीआयने आज सुनावणीदरम्यान संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी अर्ज केला. न्यायालयाने सहमती देत १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी परवानगी दिली.

ज्येष्ठ वकील ॲड. विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांच्या वतीने युक्तिवाद केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ७३ वर्षांचे आहे. त्यांना काही शारीरिक व्याधी आहेत. तीन महिन्यांहून अधिक काळापासून ते तुरुंगात आहे, तेव्हा त्यांना जामीन देण्याची मागणी केली. या प्रकरणात शिक्षा झाली तर जास्तीत जास्त सात वर्षांची होईल.

या प्रकरणात जेव्हाही सुनावणी होते त्याआधी अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर रेड पडते. चौदा वेगवेगळ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत ७० वेळा छापेमारी केली आहे, हे विशेष. २१ एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदा सीबीआयने एफआयआर नोंदवला होता. मी महाराष्ट्राचा तत्कालीन गृहमंत्री असल्याने अडकवले जात आहे, असे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे म्हणणे आहे.

१ नोव्हेंबर रोजी ईडीने केली होती अटक

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज (Bail application) न्यायालयाने १७ जानेवारी रोजी फेटाळून लावला होता. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेले देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग (Money loading) आरोपाअंतर्गत चौकशी सुरू आहे. १ नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली आणि कोठडीत रवानगी केली होती. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

'ते' स्क्रीनशॉट व्हायरल करते .. पैसे दे! जम्मू काश्मीरच्या महिला क्रिकेटरला सेक्सटॉर्शनप्रकरणी अटक

"सावळ्या रंगामुळे प्रोजेक्टमधून काढलं जातं" येडं लागलं प्रेमाचं फेम अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

CSK च्या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी आईचे निधन

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकाच्या दुकानातून दहा लाखांची रोकड लंपास; कामगाराविरुद्ध खडक पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT