Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

वारकऱ्यासांठी विकास आराखडा तयार करणार : CM एकनाथ शिंदे

'हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळं लागेल ती मदत वारकऱ्यासांठी केली जाईल.'

सकाळ डिजिटल टीम

'हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळं लागेल ती मदत वारकऱ्यासांठी केली जाईल.'

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळालाय. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.

महापूजेनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना वारकऱ्यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या हितासाठी मी विठ्ठलाकडं प्रार्थना केलीय. माझ्या कार्यकाळात मी वारकऱ्यासांठी विकास आराखडा तयार करणार असून स्वच्छ आणि सुविधायुक्त पंढरपूर साकारणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळं लागेल ती मदत वारकऱ्यासांठी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

माझ्यासाठी आजचा हा आनंदा दिवस असून 12 कोटी जनतेच्या वतीनं आज मी विठ्ठलाची पूजा केलीय. शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी पांडुरंगाला मी साकडं घातलंय. राज्यातील कोरोनाचं संकट लवकर दूर होईल, असंही ते म्हणाले.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठूनामाचा जयघोष करत पंढरीच्या पावनभूमीत आले आहेत. गेली दोन वर्ष कोरोनामुळं कार्यक्रम होऊ शकला नाही. पण, यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. १० लाखांहून अधिक वारकरी या वारीत सहभागी झाले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाचं संकट गेलं पाहिजे. ते जातंय, परत वाढतंय; पण आता त्याची जाण्याची वेळ आलीये. पांडुरंगाच्या पुण्याईनं हे संकट देखील दूर होईल. राज्यावरील दु:ख, अरिष्ट, संकट, सर्व अडचणी दूर होवो, अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करत असून विठ्ठलाला साकडही घातल्याचं शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT