Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

सलग दुसऱ्या वर्षी मला शासकीय पूजेचा मान, मी भाग्यवान समजतो - मुख्यमंत्री शिंदे

आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली.

सकाळ डिजिटल टीम

आमच्या सरकारनं विविध योजना सुरु केल्या. महात्मा फुले योजनेंतर्ग पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा आपण निर्णय घेतला आहे.

आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा पूजेचा हा मान मिळाला.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

सलग दुसऱ्या वर्षी मला पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला, मी खूप भाग्यवान समजतो, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ते वारकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते.

आषाढी वारीला लाखोंच्या संख्येने लोक पायी चालत येत असतात. आज आपण पाहतो संपूर्ण पंढरपूर पांडुरंगमय झालंय, वारकरीमय झालंय. सगळीकडं पांडुरंगाचं नामस्मरण आपल्या ऐकाला मिळत आहे.

पत्रकारांनी मला विचारलं तुम्ही पांडुरंगाकडं काय मागितलं? मी बळीराजाचं संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडू दे, असं साकडं घातलं. आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत सुरु आहे. मविआच्या काळात काम थांबली होती, ती आता आम्ही पूर्ण करत आहोत.

आमच्या सरकारनं विविध योजना सुरु केल्या. महात्मा फुले योजनेंतर्ग पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. 15 लाख वारकऱ्यांचा विमा देखील काढला आहे, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगल काळे हे गेल्या २५ वर्षांपासून पंढरीची पायी वारी करत आहेत. भाऊसाहेब व्यवसायानं शेती करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT