political esakal
महाराष्ट्र बातम्या

आशिष शेलारांची मागणी मान्य; गृहमंत्र्यांची सभागृहात मोठी घोषणा

राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र शिजत नाही ना?

सकाळ डिजिटल टीम

'राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र शिजत नाही ना?'

मुंबई - सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी आणि आयटी विभागाच्या छापेमारीचं सत्र सुरुचं आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना?, अशी शंका सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित झाली. आता याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे आशिष शेलार यांनी केली. त्यामुळे शेलार यांची मागणी मान्य करत आज अधिवेशनात गृहमंत्र्यांनी या चौकशीची घोषणा केली आहे.

यावेळी शेलार म्हणाले, या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना?, असा सवाल उपस्थित होतो आहे. राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र शिजत नाही ना? त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करत आहेत का? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे सवाल समोर येत आहेत. या घटनांमुळे महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

दरम्यान, राज्य पोलिस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापा-याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करत असल्याचे उघड झाले आहे. यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलबित केले. या कारवाईचे स्वागत करत शेलार यांनी एका गंभीर बाबीकडे आज विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT