Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कट्टर शिवसैनिकाने सोडली साथ, शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

उध्दव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी साथ सोडली. तेव्हापासून ते आतापर्यंत शिवसेनेतील आऊटगोईंग सुरूच आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पक्षांतरांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. पक्षात दोन गट पडले. त्यानंतर माजी आमदार तसेच पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. उध्दव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी साथ सोडली. तेव्हापासून ते आतापर्यंत शिवसेनेतील आऊटगोईंग सुरूच आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. उध्दव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

सोलापूरमधील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात काय चालय असं म्हणत साईनाथ अभंगराव यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर साईनाथ अभंगराव हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी सोलापूर जिल्ह्यातील शरद कोळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सोलापूर, पंढरपूर या भागातील जून्या व निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये धुसफूस वाढल्याचे दिसून येत आहे. यातूनच अभंगराव यांनी शरद कोळीच्या निवडीवर आक्षेप घेत राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शरद कोळी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT