Kolhapur Politics : कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड, टोकाचे विरोधक आले एकत्र; तब्बल 9 वर्षांनी 'त्या' Photo ची झाली आठवण

२००७ पासून या दोघांत राजकीय वाद आहे.
Kolhapur Politics Dhananjay Mahadik Satej Patil
Kolhapur Politics Dhananjay Mahadik Satej Patilesakal
Summary

महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्यासाठी मी जिवाचे रान करणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे टोकाचे विरोधक असलेले खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) व आमदार सतेज पाटील (Satej Patil) काल (शनिवार) एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले खरे, पण त्यांच्यात संभाषण तर दूरच पण नजरानजरही झाली नाही.

Kolhapur Politics Dhananjay Mahadik Satej Patil
जयंत पाटलांचे कट्टर समर्थक मानसिंगरावांचा कोणाला पाठिंबा, साहेब की दादा? 'या' बैठकीला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण

निमित्त होतं कृषी विभागाच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाचे आणि या दोघांना एकत्र आणले ते पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीमुळे. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या (रामेती) विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन काल झाले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, तर निमंत्रितांच्या यादीत सर्व लोकप्रतिनिधींसह खासदार महाडिक व आमदार पाटील यांचीही नावे होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सतेज पाटील हे प्रवेशद्वारावरच मंत्री मुश्रीफ यांच्या प्रतीक्षेत थांबले तर आत धनंजय महाडिक हेही मुश्रीफ यांची वाट बघत होते.

Kolhapur Politics Dhananjay Mahadik Satej Patil
Maratha Reservation : 'जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल, त्‍याला आता सुटी नाही'; जरांगे-पाटलांचा स्पष्ट इशारा

मुश्रीफ येताच पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. या दोघांनाही घेऊन मुश्रीफ यांनी एकत्र फेटे बांधले. त्यावेळी मुश्रीफ यांच्या उजव्या बाजूला महाडिक तर डाव्या बाजूला पाटील बसले. नऊ वर्षानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले. पण, त्यांच्यात संभाषण तर नाहीच पण नजरानजरही झाली नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींना बघताच मात्र दोघांच्याही चेहऱ्यावर हसरे भाव दिसले. दोघांच्या या भेटीचीच चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दिवसभर सुरू होती.

Kolhapur Politics Dhananjay Mahadik Satej Patil
Loksabha Election : राज्‍यात 48 पैकी महायुतीचे 45 खासदार निवडून येतील; BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास

विकासासाठी दोघांचेही सहकार्य घेणार-मुश्रीफ

यापुढे मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला असेल त्याठिकाणी खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील हे दोघे एकत्र असतील असे सांगतानाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी या दोघांना सोबत घेणार असल्याचे सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा असतील. पण, महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्यासाठी मी जिवाचे रान करणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

‘त्या’ फोटोची आठवण

२००७ पासून या दोघांत राजकीय वाद आहे. २०१४ साली राष्ट्रवादीने लोकसभेची उमेदवारी धनंजय महाडिक यांना दिली, पण त्यांच्या विजयात अडसर होता तो सतेज पाटील यांचा. याची जबाबदारी मुश्रीफ यांनीच घेतली. मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यासह पाटील यांच्या निवासस्थानी दोघांची एकत्रित बैठक घेतली. त्यावेळीही हे दोघे श्री. मुश्रीफ यांच्या डाव्या, उजव्या बाजूला बसले होते. त्या निवडणुकीत महाडिक विजयी झाले, पण त्यानंतर या दोघांतील संघर्ष कमी होण्याऐवजी टोकाला पोहचला. आज नऊ वर्षांनी त्या फोटोचीही आठवण झाली.

Kolhapur Politics Dhananjay Mahadik Satej Patil
Raju Shetti : गुऱ्हाळघरे बंद केलीत तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल; राजू शेट्टींचा थेट इशारा

फेसबुकवर उपस्थितीचा उल्लेख

या कार्यक्रमाची फोटोसह बातमी सतेज पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. त्यात खासदार महाडिक यांच्या उपस्थितीचा उल्लेख केला आहे. यापूर्वी भाषणात त्यांचे नावही न घेणाऱ्या पाटील यांनी त्यांच्या नावाचा केलेला उल्लेखही चर्चेचा विषय ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com