Ladki Bahin Yojana  esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एकदम मिळणार ६००० रुपये; ई-केवायसी, दुरुस्ती, संशयित लाभार्थींची पडताळणी सुरू; सरकारने दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ‘ई-केवायसी’ बंधनकारक आहे. पण, ‘ई-केवायसी’ करताना झालेल्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी पर्याय खुला करून दिला आहे. दुसरीकडे ‘ई-केवायसी’ राहिलेल्या महिलांसाठी मुदतवाढही दिली आहे. तसेच संशयित लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीही सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ‘ई-केवायसी’ बंधनकारक आहे. पण, ‘ई-केवायसी’ करताना झालेल्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी पर्याय खुला करून दिला आहे. दुसरीकडे ‘ई-केवायसी’ राहिलेल्या महिलांसाठी मुदतवाढही दिली आहे. तसेच संशयित लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीही सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या चार महिन्यांचे सहा हजार रुपये एप्रिलमध्ये एकदम मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाभ वितरित होईल, असा शासन निर्णय झाला आहे. राज्यातील सव्वादोन कोटी पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा सरासरी ३२०० कोटी रुपये लागतात. मात्र, डिसेंबरपासून लाडक्या बहिणींसाठी निधी मिळालेला नाही. आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी परिपूर्ण तथा अचूक झाली आणि निकषांनुसार त्या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरत असतील तर त्यांना लाभ मिळेल, अशी चर्चा आहे.

पण, ई-केवायसी अचूक असलेल्यांमध्ये हजारो लाभार्थी २१ वर्षांखालील आहेत, काही ६५ वर्षांवरील आहेत, काहींचा मृत्यू झाला आहे. अशी नावे योजनेतून कायमची हटविण्याचीही कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी, त्यांची अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. त्यामुळे ई-केवायसी, त्यातील दुरुस्ती व पडताळणी पूर्ण झाल्यावरच पात्र लाडक्या बहिणींचे पैसे वितरित होतील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.

मुदतीत ई-केवायसी करावी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आणि ई-केवायसीतील त्रुटी सुधारण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक लाभार्थींनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे पात्र महिलांचे पैसे अडकले होते. त्यांनी मुदतीत चूक दुरुस्ती करावी.

- नयना गुंडे, आयुक्त, महिला व बालविकास, पुणे

निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्यांची संख्या मोठी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावे, ती सरकारी नोकरदार नसावी, एकाच कुटुंबातील दोन लाभार्थी (एक विवाहित व एक अविवाहित) असाव्यात, लाभार्थीचे वय २१ ते ६५ वर्षांपर्यंतच असावे, अशा प्रमुख अटी आहेत. मात्र, योजनेच्या निकषांना फाटा देऊन अनेक महिलांनी लाभ घेतला. आता ई-केवायसी व पडताळणीअंती अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या खूप मोठी असू शकते, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची स्थिती

  • एकूण लाभार्थी

  • ११,३०,५६३

  • दरमहा लागणारा निधी

  • १६९.५८ कोटी

  • पडताळणीत लाभार्थी कमी

  • अंदाजे २ लाख

  • सध्या पडताळणी सुरू

  • १,१७,५५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT