zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

खासगी माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत व हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे. साधारणत: २५० पटसंख्येसाठी एक कला किंवा क्रीडा शिक्षक, ५०० पटसंख्येसाठी कला व क्रीडा अशी दोन पदे आणि ७५० पटाच्या शाळेत कला, क्रीडा, संगीत किंवा हस्तकला शिक्षक भरता येणार आहे. १००० पटसंख्येच्या शाळांमध्ये कला, क्रीडा, संगीत, हस्तकला अशी चार पदे भरता येतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : खासगी माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत व हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे. साधारणत: २५० पटसंख्येसाठी एक कला किंवा क्रीडा शिक्षक, ५०० पटसंख्येसाठी कला व क्रीडा अशी दोन पदे आणि ७५० पटाच्या शाळेत कला, क्रीडा, संगीत किंवा हस्तकला शिक्षक भरता येणार आहे. १००० पटसंख्येच्या शाळांमध्ये कला, क्रीडा, संगीत, हस्तकला अशी चार पदे भरता येतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. क्रीडा शिक्षकांना ‘बीएड’चा तर कला, संगीत, हस्तकला शिक्षकांना ‘डीएड’चा स्केल मिळणार आहे.

यंदाच्या शिक्षक भरतीत शालेय शिक्षण विभागाने खूप मोठे बदल केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीची अट नसणार आहे. ‘टीईटी’चे गुण, व्यावसायिक व शैक्षणिक अर्हतेच्या गुणांवरून त्यांच्या गुणवत्ता यादीनुसार निवडी होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी उमेदवारांना १०० शाळांचा प्राधान्यक्रम निवडता येणार असून, ही प्रक्रिया जुलैअखेर सुरू होईल.

दुसरीकडे, खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदासाठी १०० गुणांमधून सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांचीच निवड होईल. संबंधित संस्थेला मुलाखतीतून उमेदवारास १० गुण देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच पवित्र पोर्टलवरील उमेदवारांच्या कागदपत्रांवरून (शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता) व ‘टीईटी’त मिळालेल्या एकूण गुणांंवरून ९० गुण दिले जाणार आहेत. उमेदवारास ‘टीईटी’तून ७५ गुण, व्यावसायिक अर्हतेसाठी ८ व शैक्षणिक अर्हतेनुसार ७ गुण मिळतील. त्यातून सर्वाधिक गुण मिळालेला उमेदवार त्या संस्थेत शिक्षक म्हणून निवडला जाईल. खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ५० शाळा तथा संस्थांचा प्राधान्यक्रम भरता येणार आहे.

१५ ते १८ हजार शिक्षकांची होईल भरती

खासगी अनुदानित शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सध्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर पुढील १५-२० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. १५ ऑगस्टपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन आहे. या शिक्षक भरतीद्वारे राज्यात अंदाजे १५ ते १८ हजार शिक्षकांची भरती होईल.

- शशिकांत चिमणे, सहायक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

झेडपी शाळांमधील ‘त्या’ पदांची पात्रता ठरेना

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांच्या प्रत्येक केंद्रास एक कला किंवा क्रीडा शिक्षक मिळणार आहे. या पदांसाठी मंजुरी मिळाली आहे, पण त्या पदांची पात्रता अजून निश्चित झालेली नाही. बीएड की डीएड पात्रता असलेला शिक्षक घ्यायचा, त्यांना ‘टीईटी’ बंधनकारक राहणार का, यावर अभ्यास सुरू आहे. पुढील शिक्षक भरतीत ही पदे भरली जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

SCROLL FOR NEXT