Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: तब्येतीविषयी मोठी अपडेट; पवारांवर शस्त्रक्रिया होणार

राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar health update : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. पवार उद्या ब्रीच कॅंडी रुग्नलयात पुन्हा दाखल होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना १८ जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Sanjay Raut : "संजय राऊत भांग पिऊन आमच्यासोबत फोटो काढला का?"

याआधी शरद पवार यांच्या एक डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे आता ब्रीच काँडी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया होणार आहे. आधीची शस्त्रक्रिया सुद्धा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली होती.

मध्यंतरी दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्यामुळे तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तब्येत बरी नसताना सुद्धा शरद पवार शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर होते. त्यानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले होते.

Praniti Shinde : भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी; पक्षानं प्रणिती शिंदेंना दिली नवी जबाबदारी

याआधीही मार्च महिन्यात शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास झाला होता. शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT