भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी; पक्षानं प्रणिती शिंदेंना दिली नवी जबाबदारी I Praniti Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla praniti shinde

निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसनं मोठी खेळी खेळली आहे.

Praniti Shinde : भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी; पक्षानं प्रणिती शिंदेंना दिली नवी जबाबदारी

सोलापूर : सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) उफाळून आला आहे. सर्वोच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी सुरु आहे. त्यातच यावर्षी कर्नाटकात निवडणुका होणार असल्याने मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील काही राज्यावर दावा करत असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: Brazil Parliament : निवडणुकीत पराभव झाल्यामुळं संसदेत मोठा हिंसाचार; सभागृहात घुसून आंदोलकांनी केली तोडफोड

मात्र, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं (Congress) मोठी खेळी खेळली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) तोंडावर काँग्रेसनं सध्या तयारी सुरू केलीये. काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षांकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना काँग्रेस पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आलीये.

हेही वाचा: Crime News : हृदय पिळवटून टाकणारी घटना; निर्दयी आईनं पोटच्या 4 महिन्याच्या चिमुरड्याची फावड्यानं केली हत्या

लोकसभेच्या जागेवर निरीक्षक म्हणून निवड

कर्नाटकातील दावणगिरी लोकसभा मतदारसंघाचे (Davangere Lok Sabha Constituency) निरीक्षक पदाची जबाबदारी आमदार शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलीये. यंदा कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेत्यांवर कर्नाटकातील लोकसभेच्या जागेवर निरीक्षक म्हणून निवड केलीये. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांची यादीही जाहीर केली आहे.