महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : कार्यकर्त्यांनो, 'जिवाचे रान करून कामाला लागा'

सकाळ वृत्तसेवा

वरवंड : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच शिखर राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची चौकशी लावली होती. त्या वेळी त्यांनी संचालक मंडळही बरखास्त केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस याचा सहानुभूती मिळविण्यासाठी वापर करत आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून काम करावे, असेही ते म्हणाले.

वरवंड (ता. दौंड) येथे दौंड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार ऍड. राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर, तालुकाध्यक्ष गणेश आखाडे, मनोज फडतरे उपस्थित होते. 

राष्ट्रवादी व कॉंग्रेस सरकारने जी कामे केली नाहीत, ती कामे भाजप सरकारने केली. भाजपने गरीब व वंचित वर्गाला वर आणण्याचे काम केले आहे, त्यामुळे भाजपला चांगले वातावरण आहे, असा दावा दानवे यांनी केला. भाजप दोन खासदारांचा पक्ष होता. आज तीनशेच्या पुढे खासदार आहेत. अनेक जण राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळेच विरोधक भाजपवर टीका करीत आहेत.

तसेच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून काम करावे. घरोघरी जाऊन मतदाराला भेटा, असा सल्लाही दानवे यांनी दिला. या वेळी राज्यमंत्री संजय भेगडे, वासुदेव काळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी इतर पक्षातील काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT