esakal | पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मारहाण; तोंडावर फेकला ग्लास
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मारहाण; तोंडावर फेकला ग्लास

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात त्यांची चौकशी सुरु होती. मात्र, या चौकशीदरम्यान अब्बासी यांना अधिकाऱ्यांनी मारहाण करत तोंडावर ग्लास फेकला. 

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मारहाण; तोंडावर फेकला ग्लास

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात त्यांची चौकशी सुरु होती. मात्र, या चौकशीदरम्यान अब्बासी यांना अधिकाऱ्यांनी मारहाण करत तोंडावर ग्लास फेकला. 

भ्रष्टाचारप्रकरणी अब्बासी यांना 19 जुलैला ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपावरून अब्बासी हे सध्या 'नॅशनल अकाउंटबिलिटी ब्युरो'च्या (नॅब) ताब्यात आहेत. या भ्रष्टाचारप्रकरणी अब्बासी यांची चौकशी करण्यात येत होती. त्यादरम्यान त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला अब्बासी यांनी उत्तर दिले नाही. त्यांच्या या अशाप्रकारच्या वागण्यामुळे चौकशी अधिकारी प्रचंड संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी चिडून अब्बासी यांना मारहाण केली. तसेच या मारहाणीनंतर पाण्याने भरलेला ग्लासही अब्बासी यांच्यावर फेकण्यात आला. 

मध्यप्रदेशातील सेक्स रॅकेटचे मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांशी कनेक्शन

दरम्यान, खुद्द माजी पंतप्रधान अब्बासी यांना अशाप्रकारे वागणूक मिळाल्याने पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करा- शेट्टी

loading image