nana patole sakal media
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: 'आधी आमदार तरी बना.. ', नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर भाजप नेत्याचा टोला

'मी मुख्यमंत्री होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण व्हावी', नाना पटोले यांचं वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरुन राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू आहेत. भाजप-शिंदे गट यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काही नेते भाजप-शिंदे गट यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्रिपद अजित पवार यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना खोचक टीका केली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना अशिष शेलार म्हणाले की, 'नाना पहिले आमदार बना, मुख्यमंत्री बनण्याआधी आमदार बनावं लागतं. तो पहिला प्रयत्न यशस्वी होतात का बघा', असा टोला शेलारांनी नाना पटोलेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले?

'आपण मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो', असे पटोले म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थान दर्शनासाठी पोहचले होते. तसेच खुलदाबाद शहरातील दर्ग्यावरती त्यांनी चागर देखील चढवली. यावेळी नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाबद्दल प्रश्न विचारला. एबीपी माझाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

'कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या मनात हा विचार येत असेल तर ही दैवी कृपा आहे. लोक या श्रद्धेने काम करतात. शेवटी देव कोणालातरी निमित्त करत असतो, देवाला मला निमित्त करून अजून काही चांगलं करून घ्यायचं असेल तर तो देवांचा अशीर्वाद असतो. मनुष्य हा कृती आणि कर्म करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे जे काही कोणाच्या मनोकामना, सोबती आणि चाहत्यांच्या इच्छा असतील ती पूर्ण होवो', असे नाना पटोले म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT