Shivsena-Bjp
Shivsena-Bjp 
महाराष्ट्र

भाजपच्या गुगलीने शिवसैनिक संभ्रमात

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सत्तास्थापनेनंतर सतत शिवसेनेसोबत सापत्नभावाने वागणाऱ्या भाजपने अकस्मात युतीची जाहीर भाषा सुरू केल्याने सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. भाजपचे हे युतीप्रेम केवळ "गुगली' असल्याची भावना शिवसेना नेते व शिवसैनिक व्यक्‍त करत असून, या वेळी भाजपच्या डावपेचाला बळी पडणार नसल्याचे संकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत.

प्रत्येक मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांना युतीबाबत कोणत्याही संभ्रमात राहू नका, असे निरोप पक्षनेत्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती व्हावी, अशी भाजप व शिवसेनेच्या खासदारांची प्रामाणिक भावना असल्याचे सांगण्यात येते. मात्र लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाली, तरच भाजपसोबत युती करण्याबाबत विचार व्हावा, असे काही शिवसेना नेत्यांचे मत आहे.

एकदा लोकसभेसाठी युती केली, तर नंतर भाजप विधानसभेसाठी युती करण्याची खात्री नसल्याचे अनेक शिवसेना नेत्यांना वाटते.
भाजपच्या युतीबाबतच्या भूमिकेने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. राज्यात स्थानिक पातळीवर शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. हे दोन्ही मित्रपक्षांचे स्थानिक कार्यकर्ते परस्परांना नंबर एकचे शत्रू मानत असताना युतीचा निर्णय झाला, तर अनेक शिवसैनिक फारकत घेत बंड करतील, अथवा इतर पक्षांचा पर्याय निवडतील, असेही काही शिवसेना नेत्यांचे मत आहे. त्यामुळे शिवसैनिकांना संभ्रमात टाकून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या भूमिकेतूनच भाजपने युतीची गुगली टाकल्याची भावना एका शिवसेना नेत्याने व्यक्‍त केली.

मात्र उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत अजिबात चर्चा करण्याची तयारी नसल्याचे काही मोजक्‍या शिवसेना नेत्यांना कळवले असून, प्रत्येक मतदारसंघात स्वबळावरच तयारीला लागण्याचे निरोप दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT