BJP
BJP 
महाराष्ट्र

प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे.

रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेला उधाण आले आहे. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. संजय कुटे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, संभाजी निलंगेकर या नावांची सध्या चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघटनात्मक पातळीवर सक्षम काम करण्याची क्षमता असलेल्या नेत्याची या पदावर निवड करण्यात येणार असल्याचे समजते. तरुण चेहरा असलेले संभाजी निलंगेलकर हे मुख्यमंत्र्यांच्या निकटचे मानले जातात. लातूरच्या राजकारणात विलासराव देशमुखांच्या गटाचे वर्चस्व मोडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी भाजपला यश मिळवून दिले होते. यंदा नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या पराभवालाही त्यांच्या कामामुळे मदत झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT