home building sakal
महाराष्ट्र बातम्या

रस्त्यालगत नवीन घर बांधताय का? रस्त्यापासून ३ ते ४० मीटर अंतराचे बंधन; नाहीतर अतिक्रमणाची होईल कारवाई

महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, शहरांतर्गत रस्ते व पाण्याच्या कालव्यालगत घर बांधताना अंतराची मर्यादा पाळणे बंधनकारक आहे. अन्यथा, भविष्यात अतिक्रमणाच्या नावाखाली त्या घरावर बुलडोजर चालविला जाऊ शकतो.

तात्या लांडगे

सोलापूर : रस्त्यालगत घराचे बांधकाम करताना रस्त्याची रुंदी किती, त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची अंदाजे संख्या, या बाबींचा विचार करून घर आणि रस्ता, यातील अंतर निश्चित होते. महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, शहरांतर्गत रस्ते व पाण्याच्या कालव्यालगत घर बांधताना अंतराची मर्यादा पाळणे बंधनकारक आहे. अन्यथा, भविष्यात अतिक्रमणाच्या नावाखाली त्या घरावर बुलडोजर चालविला जाऊ शकतो.

घर बांधण्यासाठी ज्या काही जागेची निश्चिती केली जाते, ती एक मोक्याची जागा असते. रस्त्यालगत घर असणे खूप प्रतिष्ठेचे किंवा भविष्यकालीन फायद्याचे मानले जाते. यामध्ये रस्त्यालगत घर बांधण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत असो किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे काही नियम वेगवेगळे आहेत. या नियमांना धरूनच घराचे बांधकाम केल्यास भविष्यातील नुकसान टाळता येते.

अन्यथा, बऱ्याचदा नियम डावलून घर बांधल्यास रस्त्याचे विस्तारीकरण किंवा इतर काही कामांमुळे अतिक्रमणाच्या नावाखाली ते घर पाडले जाते व मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. दरम्यान, सध्या शहर असो वा ग्रामीण भाग किंवा महामार्ग किंवा जिल्हा मार्गांवरील वस्तुस्थिती खूपच वेगळी असल्याचे दिसून येते. कालव्यापासून २०० मीटर अंतरावर घर किंवा कोणतेही बांधकाम असू नये, असा नियम आहे. मात्र, त्याचीही पायमल्ली झाल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच सोलापूर शहरातील अनेक नगरांचा श्वास कोंडल्याची स्थिती आहे.

रस्त्यालगत घर बांधण्यासाठी नियम

रस्त्यालगत घर बांधता येते, परंतु त्या बाबतीतील नियम नगरपालिका किंवा महापालिका ठरवत असते. हे नियम राज्य सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार केले जातात. रस्त्यालगत घर बांधायचे असल्यास रस्त्याची रुंदी माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये संबंधित भूखंडावर सर्व संबंधित सरकारी विभागाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. साधारणत: महामार्गालगत घर बांधण्यासाठी घराचा प्लॉट हा रस्त्यापासून कमीत कमी ७५ फूट अंतरावर असावा. दुसरे म्हणजे जिल्हा मार्गालगत ६० फूट आणि जिल्ह्यांतर्गत रोडलगत किमान ५० फूट अंतर सोडणे बंधनकारक आहे.

महामार्गालगत बांधकामासाठी ४० मीटरची मर्यादा

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार महामार्गाच्या मध्यभागापासून ७५ मीटरच्या परिघात कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु, यामध्ये बांधकाम महत्त्वाचे असल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग मंत्रालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण कायद्याच्या कलम ४२ नुसार नवीन प्रणालीत महामार्गाच्या मध्यापासून ४० मीटरपर्यंतच्या बांधकामाला परवानगी दिली जात नसल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गावातील बांधकामासाठी काय आहे नियम?

ज्या गावांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे, त्याठिकाणी जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम करायचे झाल्यास शासनाच्या नियमानुसार रस्त्यापासून किमान ३ मीटर अंतर सोडणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी होते की नाही, याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवकांवर असते.

गावात रस्त्यालगत घरे बांधताना अंतराचे बंधन

अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत पूर्वी नॉन-प्लॅन घरे बांधली आहेत. अगदी रस्त्याला चिकटूनच घरे आहेत. पण, आता नव्याने किंवा रस्त्यालगत त्याच ठिकाणी घर बांधताना ३ मीटर अंतर सोडावे लागते.

- इशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhad Mahotsav : इच्छुक उमेदवारांकडून यावर्षी प्रथमच गाव पातळीपासुन तालुकापातळीपर्यंत आखाड महोत्सवाचे आयोजन

Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह कसा हाताळावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Shanukripa Heartcare: हृदयविकारावर शस्त्रक्रियेविना उपचार! शनिकृपा हार्टकेअर सेंटरचा २५ वर्षांचा यशस्वी प्रवास

Junnar News : अंबोलीतील दाऱ्याघाटात पर्यटकांची झुंबड; निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी सहलींच्या संख्येत होतेय वाढ

SCROLL FOR NEXT