Aurangabad
Aurangabad 
महाराष्ट्र

दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले. सचिन प्रकाशराव अंदुरे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्यानेच दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

नालासोपारा प्रकरणाशी संबंधित केसापुरी (ता. औरंगाबाद) येथील शरद भाऊसाहेब कळसकर याला अटक झाली होती. त्याच प्रकरणात शहरातील एका तरुणाचा संबंध असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले होते. त्यामुळे निराला बाजार परिसरात एका हॉटेललगत असलेल्या कापड दुकानावर पाळत ठेवून मंगळवारी (ता. 14) दुपारी साडेबाराच्या सुमारास सचिन अंदुरेला पकडून क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले होते. दरम्यान, सचिन अंदुरे हा दौलताबादचा रहिवाशी असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

कोण आहे सचिन अंदुरे? 
- सचिन हा मूळचा दौलताबादचा रहिवासी 
- औरंगाबादमधील राजाबाजारमधील वेणू निवास इमारतीत भाड्याने वास्तव्य 
- औरंगाबादमध्ये पत्नी व तीन महिन्यांच्या मुलीसह दहा महिन्यांपासून वास्तव्य 
- औरंगाबाद सासरवाडी असलेल्या सचिनला एक मोठा भाऊ 
- निराला बाजार भागातील एका कापड दुकानात नोकरी 
- अंदुरेच्या अटकेपासून त्याच्या राजाबाजारमधील घराला कुलूप 
- सचिन दहिहंडी, मिरवणुकांमध्ये असायचा सहभागी 
- सचिनचा कोणाशीही वाद नसल्याची शेजाऱ्यांची माहिती 
- सचिनच्या फेसबुक अकाउंटवर केवळ प्रखर हिंदुत्ववादी पोस्ट 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT