Chhagan Bhujbal reaction on devendra fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांच्या आरोपावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले,पुराव्यावर...

पुराव्यावर माझा विश्वास नाही- छगन भुजबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) ते प्रवीण चव्हाण व्हिडिओ अशा अनेक मुद्यावर आरोप केले आहेत. व्हिडिओत धक्कादायक अशी माहिती असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच एका व्हिडिओमध्ये या सगळ्याला अजित पवार सपोर्ट करत नसल्याचा उल्लेख असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या व्हिडिओत अजित पवार सपोर्ट करत नाही, पण बडे साहब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का. चांगल्या अधिकाऱ्यांची नावे द्या असं त्यांनी सांगितलंय. त्यांची नावे द्या आणि त्यानंतर आपण कारवाई करू असं मला सांगतिलं आहे असे फडणवीस आज म्हणाले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर प्रत्यूत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, फडणवीसांनी केलेला आरोप आणि सादर केलेला व्हिडिओ खरा आहे का हे पहिल्यांदा तपासावा लागेल. फडणवीस सांगताहेत हे खर खशावरून, हा आवाज नेमका कोणाचा, कोण बोललं हे बघावं लागेल कारण पवार साहेब असे कुणाच्याही बाबत असे भाष्य करणार नाही. त्या पुराव्यावर माझा विश्वास नाही असे मत भुजबळांनी व्यक्त केले आहे. त्यांनी अध्यक्षांना पुरावे १३० तास व्हिडिओ दिले याचे आश्चर्य वाटत आहे. पेगासीस देखील एवढं काम करेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले, पवार साहेब असे कुणाच्याही बाबत असे भाष्य करणार नाही. त्या पुराव्यावर माझा विश्वास नाही

नवाब मलिकांच्यावरील आरोपांविषयी बोलताना भुजबळ म्हणाले, ईडी म्हणतंय टायपिंग मिस्टक आहे. व्यवहार दाऊद सोबत झाला हे कुणी सांगितले. नवाब मलिक यांचा नेमका काय व्यवहार झाला. का ते मुस्लिम आहेत म्हणून दाऊदशी त्यांचा संबंध जोडला जात आहे असेही भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT