सीमकार्डच्या माध्यमातून विद्युत निर्मितीत भ्रष्टाचार; बावनकुळेंचा गौप्यस्फोट

ऊर्जा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची आली वेळ
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankuleesakal

मुंबई : महाराष्ट्रातील वीज कंपन्या डबघाईस आल्या त्यात भाजपा (BJP) सरकारचा दोष नाही. आम्ही एकाही शेतकऱ्याची वीज तोडली नाही, तरीही विद्युत निर्मिती कंपन्या नफ्यात चालवल्या. पण आता भ्रष्टाचार वाढला असून, २३ ते २४ सीमकार्डच्या माध्यमातून हा गैरव्यवहार सुरू असल्याचा गौप्यस्फोट आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. आजे ते विधानपरिषदेत बोलत होते.

वीजबिल थकबाकी भाजपच्या सरकारचे पाप असल्याचे सोमवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) बोलले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. ते म्हणाले,आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील तीनही विद्युत कंपन्या नफ्यात होत्या. आता त्या अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या असून त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो आहे. महाराष्ट्रात ऊर्जा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule
लवकरच पंचायत निवडणूक लढवणार; लुईजिन्हो फलेरोंची घोषणा
Summary

वीजबिल थकबाकी भाजपच्या सरकारचे पाप असल्याचे सोमवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत बोलले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

भाजप सरकारच्या कामाचा पाढा वाचताना बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात महापारेषण, महाजेनको आणि महावितरण या तीनही वीज निर्मिती कंपन्या नफ्यात होत्या. या कंपन्या अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या. त्यात कोण कोण गुंतलंय, सगळ्या सीमकार्डचे नंबरही सांगणार असा इशारा ठाकरे सरकारला दिला.

Chandrashekhar Bawankule
पॉर्न व्हिडिओ पाहून 2 अल्पवयीन मुलींवर 5 तरुणांचा सामूहिक बलात्कार

बावनकुळेंनी विद्युत निर्मिती प्रकल्पाचे वहीखाते सादर केले.

या अंतर्गत महापारेषण २०१७-१८ साली ८१५ कोटींच्या,

२०१८-१९ साली ७४५ कोटींच्या आणि २०१९-२० साली ४९३ कोटींच्या नफ्यात होती.

महाजेनको विद्युत निर्मिती प्रकल्प २०१७-१८ साली ७०० कोटींच्या,

२०१८-१९ साली ३३४ कोटींच्या आणि २०१९-२० साली १२६ कोटींच्या नफ्यात होती.

महावितरण विद्युत निर्मिती कंपनी २०१७-१८ साली ४४२ कोटींच्या,

२०१८-१९ साली ८४६ कोटींच्या आणि २०१९-२० साली २०८ कोटींच्या नफ्यात होती असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com