
देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक
मुंबई: नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजप उद्या मोर्चा काढणार आहे. त्याचबरोबर भाजप नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरीषदेत केला आहे. नवाब मलिकांविरोधातील चौकशी बंद करण्यासाठी हा डाव आखला जात असल्याचेही ते म्हणाले आहेत. मलिकांच्या माध्यमातून मला अडकवण्याचा डाव होता असा आरोप केला आहे. फडणवीसांच्या या भाषणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कौतुक केले आहे.
हेही वाचा: सीमकार्डच्या माध्यमातून विद्युत निर्मितीत भ्रष्टाचार; बावनकुळेंचा गौप्यस्फोट
फडणवीसांचे कौतुक करताना पटोले म्हणाले, कायदा आणि सुवेव्यवस्थेवर इतक चांगल मार्गदर्शन फडणवीसांनी केले आहे. जे काही पुरावे, मुद्दे मांडलेत ते कौतुकास्पद आहे. मात्र यांना का वाईट वाटंतय हे कळत नाही. रश्मी शुक्लावर कारवाई शासनाने केली आहे. फडवीसांनी पोलिस दलाचा गैरवापर सरकारकडून मोठ्या प्रमाणात वाढला असा आरोप केला. यावर पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेवर भाषण केले मी त्यांचे कौतुक करतो. मात्र रश्मी शुक्लाचा वापर कोणी केला याचे उत्तर सरकारने द्यावे असा प्रश्नही नाना पटोलेंनी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
देशाच्या शत्रूशी व्यवहार करणाऱ्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार नसताना राजीनामा घेतला. मग नवाब मलिकांचा का घेतला नाही? त्यांना वेगळा न्याय आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला.
Web Title: Devendra Fadnavis Allegations React Nana Patole Nawab Malik Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..