Chitra Wagh and Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

"सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा"

आशांच्या हक्काचा कोरोना काळात ठरलेला ३५ रू. रोज त्यांना अजुनपर्यंत मिळालेला नाही. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यसंदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय साधने, प्रोत्साहन देणे यादृष्टीने 'आशा स्वयंसेविका' महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात. कोरोना काळात त्यांनी १०-१२ तास काम केले.

गावखेड्यांमध्ये कुटुंब नियोजन संदेश पोहोचविणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर सध्या काहीशा नाराज आहेत. राज्य सरकारकडून आशा वर्कर्सना कुटुंब नियोजन उपक्रमाची माहिती देण्यासाठी एक किट दिले जाते. ज्याद्वारे या आशा वर्कर्स सरकारच्या उपक्रमाची माहिती तळागाळात पोहोचवतात. या कुटुंबनियोजन किटमध्ये चक्क रबरी लिंग देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे रबरी लिंग असलेले किट घेऊन लोकांमध्ये जायचे तरी कसे आणि लोकांना माहिती द्यायची तरी कशी असा प्रश्न आशा वर्कर्सना सतावतो आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

चित्रा वाघ ट्वीट द्वारे म्हणाल्या, “सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…. थोडी लाज ठेवा मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका..”

महाराष्ट्रभरात 70 हजार आशा स्वयंसेविका काम करतायेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून अनेकदा 'आशा वर्कर्सचं' कौतुक केलं आहे. पण फक्त कौतुकाने पोट भरत नाही. आशा वर्कर्सना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतय. असे आशा स्वयंसेविकाचे म्हणणे आहे. आपल्या हक्क आणि अधिकारासाठी त्या सातत्याने रस्त्यावर उतरल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी आशा स्वयंसेविकांना त्यांच्या हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज मिळाले नाही. यावर राज्य सरकारने त्वरीत पाऊले उचलली नाही तर आशा स्वयंसेविका पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT